पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
१८१
उदर.

 आश्रय करणारे असे पोटाला फुगारा उत्पन्न करून उदररोग उत्पन्न करितात. या संप्राप्तीमध्येंहि ' दोष:, असे बहुवन आहे. वातादि दोष उदर रोग उत्पन्न करतात. यांपैकी कोणताहि एक अथवा अनेक दोन उदर उत्पन्न करतो. दोष उदररोग उत्पन्न कसा करतात ? ते विशेषतः अंबुवाहि-जलवाहि स्रोतसांचा अवरोध करतात. ही स्रोतसें कोणती ? विकाराच्या स्थानावरून तीं उदरांतील समजावयाचीं. मांगें सांगितल्याप्रमाणें उदराच्या ह्या आवरणामध्ये संचित होऊन मूत्राशयांत पाझरणारा जलांश ज्या या भागांतील स्रोतसांतून पाझरतो ती स्रोतसें बंद होतात. या लोकांत ' ऊर्ध्वाधः खाली व वर जाणारी असा उल्लेख आहे त्याचा आशय, खालीं म्हणजे मूत्राशयाकडे व वर म्हणजे रसवाही असा आहे उदराच्या एका कलेमध्ये स्रोतसांचा अवरोध झाला म्हणजे रसवाहि जलवाहि व स्वेदवाहि स्रोतसांचा अवरोध होतो व त्याच ठिकाणी या सर्व जलांशाची वाढ होते. त्याचा योग्य मार्ग बंद झाला की यथा मार्गप्रवृत्ति म्हणजे उदरत्वचेतून निघण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्वचा फाइन बाहेर पडण्याइतकें सामर्थ्य त्यांत नाहीं या मुळे सहज निघुं शकत नाहीं पण शस्त्राने भोंक पाडल्यास पाणी वाहते. या विकारांत स्त्रोतोरोध जल व रसवाहि स्रोतसांचा, संचय जलांशाचा व त्याचाच कोप, विकारस्थानी असल्यानें प्रसार संभवनीय नाहीं, हा विकार दोष करतात व वातादि दोषांचा त्यांत संबंध, स्त्रोतोरोध, फाजील अभिष्यंदाने झाला कीं रुक्षतेमुळे झाला या पोटभेदांचे ज्ञान व्हावे यासाठीं सांगितला असतो. कोणत्याहि रोगाच्या संप्राप्तीत स्थान व विकृत होणारी क्रिया सांगून ती विकृती दोषांनी होते असें सांगण्याचें कारण विकृती होत असतां प्रमुख ज्या तीन क्रिया त्यांच्यापैकी कोणत्या क्रियेची विकृती आदिकारण झाली याचा खुलासा व्हावा हे आहे.
 रोग जरी एकाद्या अवयवांत झाला तरी तो व्हावयाचा म्हणजे त्या अवयवांतील नित्य क्रियांतून एकादी विकृत होणें अवश्य असतें. तिचाच परिणाम प्रत्यक्ष रोगरूपाने होतो, ह्मणून निदानामध्ये दोषांचा संबंध अवश्य व विशेष बोधक आहे. दोष हा सामान्य शब्द योजण्यांत आलेला असतो तरी त्याचा अर्थ रोगस्थानीय दोषाचा भेद अर्थात् तेथील नित्यक्रिया करणारा जो दोष तो समजावयाचा. कोणताही विकार झाला असतां तो शरीराचा एकादा किंवा अनेक धातु अथवा याच धातूंनी बनलेल्या अवयवांवर स्पष्ट होत असतो. असे असले तरी विकृति-धातूंत दिसली तरी धातूंमध्ये स्वतः सामर्थ्य असत नाही. त्यांतील कार्यकारी विकृति होऊन मग धातूंवर परिणाम होतो हाणून रोगांचे कर्तृत्व दोषांकडे सांगितले आहे. चिकित्सा अथवा उपचार ही विकृत