पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 झालेली क्रिया दुरुस्त करणारे असतात. ज्या कोणत्या, धातु अगर आशयामध्ये, रोग होतो त्याला दूष्य हैं नांव याच उद्देशानें देण्यात आले आहे. आणि निदानाचे वेळीं दूष्य व दोष यांचा स्वाभाविक संबंध ध्यानीं घेणें अगत्य असतें. दूष्यज्ञान ह्मणजे रोगस्थानाचें ज्ञान असेंहि म्हणतां येईल. परंतु अनेक दृष्यांचे मिश्रणांपासून आशय बनले असल्याने केवळ दृष्यांवरून रोगस्थानाच्या खरूपाचा नीट बोध होणार नाहीं यासाठी स्थानसंशयच महत्वाचा होय.
 शरीराच्या एकंदर नित्यव्यापारांचे थोडक्यांत स्वरूप हाणजे उत्पादन उत्सर्जन, व पृथक्करण असें असतें. नवीन घटकांची उत्पत्ति, झिजलेल्यांचे उत्सर्जन व नव्याजुन्या घटकाचे पृथक्करण या सर्वांत तारतम्यभाव किंवा कमी अधिक महत्व कोणालाच नाहीं. सर्वच क्रिया महत्वाच्या आहेत. तथापि त्यांतहि उत्पादक क्रिया विशेष महत्वाची. कारण तीशिवाय पुढील - इतर दोन क्रियांचा संभव नसतो. या तीन क्रियाची अविकृतावस्था सारखीच रोगोत्पादक असली तरी शरीराचे अस्तित्वालाच उत्पादन क्रिया अधिक महत्वाची आहे. आणि उत्पादक जे दोष त्यांचें रोगज्ञानासाठी आवश्यक असें ज्ञान यामुळेच आहे. रोगाचें ज्ञान करुन घेतांना या तत्वाला - अनुसरून थोडा सूक्ष्म फरक ध्यानांत घेणेंहि विशेष बोधप्रद आहे. तो असा की, ज्या कोणत्या स्थानांत विकार झाला असेल तेथील उत्पादन क्रिया कमी झाली आहे की, पृथक्करण अथवा उत्सर्जन यांतील अव्यवस्थितपणा आला असल्यानें उत्पादनक्रिया कमी झाली आहे. साधारणतः मलांचा संचय उत्पादनक्रियेला व्यत्यय करतो व मलाचे आधि क्यावरून त्याची कल्पना येते. व्यत्ययामुळे होणाऱ्या रोगाहून उत्पादनक्रियेच्या कमीपणामुळे होणारे रोग अधिक कष्टसाध्य असतात, रोगी भागाची स्वाभाविक शक्ति असल्या विकारांत कमी होते. विकार धातूमध्ये होतो. आणि धातु दूषित व्हावयाचा म्हणजे अंतर्गत सामरूपी दोषांच्या विषमतेमुळे अथवा धात्वाश्रयी मलभागाच्या वियोजन क्रियेतील विषयतेमुळे. त्यांतहि मळाचा क्षय किंवा अतिविसर्ग फाजील उत्सर्जन झाले असतां धातुक्षीणता येते परंतु प्रत्यक्ष रोग होत नाहीं. पण मळांचे उत्सर्जन कमी झाले म्हणजे रोगसंभव अधिक असतो. मळासारख्या टाकाऊ घाणे-या पदार्थाचे संसर्गानें धातु त्वरित बिघडतात. आणि पृथक्करण किंवा पचन नीट न झाल्यास, ज्या धातुमध्ये हैं पचन व्हावयाचें तें धातु स्वतः व त्यापासून उत्पन्न होणारे मळ बिघडतात आणि दोष बिघडले की, धातु व मळ दोनही बिघडून रोग होतो.

दोषा दुष्टा रसैर्धातून दूपर्यंत्युभये मलान् ( अ. ह. ]