पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
त्रिदोषांचा चिकित्सेतील उपयोग. १८७

 उपाय तर सार्वदेहिक अशा विकारांना समूळ घालविणारे म्हणून मुख्य सांगण्यांत आले आहेत.

दोषाः कदाचित् कुप्यंति जिता लंघन पाचनैः ॥
ये तु संशोधनैः शुद्धा न तेषां पुनरुद्भवः॥ १ ॥ ( वाग्भट. )


  लंघनपाचनादि शमनोपायांनी जिंकलेले दोष कदाचित् पुनः कुपित होतील. परंतु शोधनोपायांनीं शुद्ध केलेल्या दोषांची पुनः उत्पत्ति होत नाहीं.

 शोधनेोपायांचा सार्वदेहिक उपयोग उघड सांगितला आहे:-
 शाखागताः कोष्ठगताश्च रोगा ममर्ध्वसर्वावयवांगजाश्च ।
ये संति तेषां न तु कञ्चिदन्यो वायोः परं जन्मनि हेतुरस्ति ॥१॥
विश्लेष्यपित्तादिमलाशयानां विक्षेपसंहारकर: स यस्मात् ।
तस्यातिमात्रस्य शमाय नान्यद वस्तेर्विनाभेषजमस्ति किंचित् ।
तस्माच्चिकित्सार्थइति प्रदिष्ट: कृत्स्ना चिकित्सापिच बस्तिरेकैः

( वाग्भट. )

 अर्थ :- शाखा, कोठा, ममें, ऊर्ध्वग इत्यादि सर्व अंगावयवांचे ठिकाणी जे विकार उत्पन्न होतात त्यांचे उत्पत्तीला वायूचे शिवाय दुसरें कारण नाहीं.
 मळ, श्लेष्मा, पित्त इत्यादि मलांच्या संचयाला फेकणारा व नाश करणारा असा जो वायु त्या अतिवृद्ध वायूला बस्तीशिवाय दुसरें औषध नाहीं.
 बस्ति हा सर्व चिकित्सेचा अर्धभाग आहे किंवा कांहींचे मतें बस्ति हा एकटाच सर्व चिकित्सा होऊ शकतो.

"विशेषेण तु वामयेत् ॥ १ ॥
नवज्वरातिसाराधः पित्तासृग्राजयाक्ष्मिणः ।
कुष्ठमेहापची ग्रथिलीपदोन्म दकासिनः ॥ २ ॥
श्वास हल्लासर्वार्सपस्तन्येदोषोर्ध्वरेगिणः ॥

 अर्थ :- विशेषेकरून, नवज्वर (आमज्वर ) अतीसार, अधोगामी रक्तपित्त, राजयक्ष्मा, कुष्ट, मेह, अपची (गंडमाला भेद ) ग्रंथि, श्लीपद, ( वारुळ ) उन्माद, खोकला, दमा, मळमळ, स्तन्यदोष व ऊर्ध्वजक्र विकार असलेल्यांना वमन द्यावे.

" विरेकसाश्या गुल्गार्शोविस्फोटयंगकामलाः ।
जोर्णज्वरोदरगरछर्दिप्लीह हलीमकाः ॥ १ ॥
विद्रधिस्तिमिरं कामः स्यंदः पक्वाशयव्यथा ।
योनिशुक्राशया रोगाः कोष्टगाः कृमयोव्रणाः ॥ २ ॥