पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
आयुर्वेदातील मूलतत्वें.



वातास्रमूर्ध्वगं रक्तं मूत्राघातः शकृदग्रहः ।
वम्यश्च कुष्ठमेह द्याः ।

 अर्थः-- गुल्म, मूळव्याधि, विस्फोट, ( मोठाले फोड ) वांग, ( एक क्षुद्ररोग अंगावर डाग पडणें ) कावीळ, जीर्णज्वर, उदर, गर (कृत्रिम, विष) वांति, प्लीहा, हलीमक (पांडुरोगाचा प्रकार ) विद्रधि, तिमिर, काच, स्यंद (नेत्रविकार) पक्काशय, शुळ, योनिरोग, शुक्राशयाचे विकार कोष्टांतील कृमि व्रण, वातरक्त, ऊर्ध्वगामी रक्तपित्त, मूत्राघात, मलावरोध आणि कुष्ट, मेह इत्यादि ( वरील ) वमनार्ह यांना विरेचन योग्य आहे.
 याप्रमाणें बस्ति, विरेचन आणि वमन यांनी जे साध्य विकार सांगितले आहेत त्यावरून या उपायांचा केवळ कोठ्यापुरताच स्थानी उपयोग होतो असे नसून सार्वदेहिक उपयोग होतो हे उघड होते. या उपायांनी शरीरांतील रोग कसे जाऊं शकतात याविषयीं आयुर्वेदाचीं कल्पना अशी आहे कीं;--
 अपथ्याचरणामुळे, कोठ्यांत वाढलेल्या दोषांचा सर्व शरीरधातूंमध्ये प्रसार होतो आणि दूषित होतात व तेच शरीरावर धातूंत प्रसार पावलेले दोष पुनः कोठ्यात परत येतात व तेथे आल्यावर शोधनोपायांनी त्यांना बाहेर काढून टाकावें म्हणजे शरीर निर्दोष होतें. दोषांचा शरीरांत प्रसार आणि ते पुनः कोठ्यांत परत कसे व कोणत्या साधनांनीं येतात याविषयी --

व्यायामादूष्मणस्तैक्ष्ण्यादीहताचरणादपि ।
कोष्टात् शाखास्थिममाणि द्रुतत्वान्मारुस्तस्य च ॥ १ ॥
दोषो यांति तथा तेभ्यः स्रोतोमुखविशोधनात् ।
वृद्धयाऽभिष्यंदनात्पाका त्कोष्टं वायोश्च निग्रहात् ॥२॥ (अ.ह.सु.)

 अर्थ:--कोठ्यांत वाढलेले दोष, व्यायाम, शारीरिक उष्णता, अपव्याचरण आणि वायूची गति यांमुळे कोठ्यांतून शाखा (रक्तादि धातु ) ममें इत्यादि शरीरांत जातात पसरतात; आणि,

 फार वाढीनें, अभिष्यंद - पाझरणे यामुळे, पचन-पृथक्करण होऊन, व वायूचे आकर्षण सामर्थ्याने परत कोठ्यांत येतात.
 याप्रमाणें उल्लेख आयुर्वेदांत आहे. याचा तात्पर्यार्थ असा कीं, शरीरांत जे एकादें दूषित द्रव्य (आम) तयार होतें तें प्रथम कोठ्यांतील अपचनदोषांमुळे होतें ( आमाची व्याख्या पहा ) आणि व्यायामादि कारणांनी त्याचा रसाबरोवर क्रमशः सर्व शरीरभर प्रसार होतो. ज्या एकाद्या भागांत त्याचाच संचय होईल त्या ठिकाणी रोगोद्भव होतो. परंतु असें हैं रोगकारी द्रव्य सर्व शरीरांत प्रसार पावतें त्यावेळीं सर्व शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करते. व एकांगी अथवा सर्वांगी