पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
आयुर्वेदातील मूलतत्वें.

 कारण रसरक्तवाहिनीप्रमाणें वातवाहिनींचें दृश्य आणि स्पष्ट असें अस्तित्व उपलब्ध नाहीं. आमाशयांतील दूषित कफ आणि पच्यमानाशयांतील दूषित पित्त ज्या प्रवाही स्वरूपाने अन्नरस आणि रसधातु यांशीं मिश्र होऊन शरीरांत प्रसार पावतात तसलेच स्वरूप वायूचें नसल्यानें पक्वाशयांत दूषित झालेला वायु विरल अणुस्वरूपी वायु शरीरांत प्रसार कसा पावावा हा प्रश्न विचारणीय राहतो.
 शरीराला त्याचे पांचभौतिकत्वाला अनुसरून सर्व तत्वांचा पुरवठा व्हावयास पाहिजे हे उघड आहे. हा पुरवठा अन्नपान, हवा, प्रकाश यांनी होत असतो. पक्वाशयामध्ये मलोत्सर्जनाचे कार्य ज्या पक्वाशयाश्रयी वायूकडून होतें तो आहारांतील वातकारक म्हणजे रूक्षादि गुणांच्या पदार्थांनी होत असतो. या पदार्थांची अधिक भर पडते त्या वेळीं पकाशयाचे स्रोतसांमध्यें वायु अधिक वाढतो व त्यामुळे पोट फुगणें, गुरगुर आवाज होणे इत्यादि लक्षणें झालेली दृष्टीस पडतात. ही जी स्थानीवाढ होते तिचीच व्याप्ति अधिक प्रमाणांत झाली असतां सर्व शरीरांत होते. अन्नांतून निघणाऱ्या रसा बरोबर सूक्ष्म प्रमाणांत या वातकारक अशा गुणांच्या पदार्थाचे सूक्ष्म अंश शरीरांत प्रसार पावतात, व विशेषतः पक्वाशयांतून कांहीं प्रमाणांत होणाऱ्या रसाचे शोषणाबरोबर वाढलेल्या वायूचा पुरवठाहि सर्व शरीरांत होतो. व प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या स्रोतोभागांत वायूची वाढ होते. अन्नरसाचें रसधातूत पर्यवसान होऊन त्याचा शरीरांत प्रसार झाल्यावर धातुपोषण होऊन जो मळ निघतो त्यांतील उत्सर्जनीय भाग पुनः त्या त्या भागांत यावा अशी शरीराची नैसर्गिक योजना दिसते. व या योजनेला अनुसरून शोधनोपचारांची योजना आहे. नवीन दोषी पदार्थांचा पुरवठा होऊं नये यासाठी ही योजना उघड पटणारी आहे. कफस्थान, पित्तस्थान, व वातस्त्राव अनुक्रमें आमाशय, पच्यमानाशय आणि पक्वाशय निर्दोष होऊन त्यांची कामे सुरळीत होऊ लागल्यावर नवीन दूषित पदार्थांची शरीरांत भर पडत नाहीं. शुद्ध पदार्थांचा पुरवठा होतो व अशा रीतीनें रोगाला आळा बसतो. म्हणजे शोधन हैं प्रतिबंधक आणि विनाशक या गुणाने कार्य करते. शोधनोपचारांचा असा सार्वदेहिक विकारांवर जो उपयोग सांगितला आहे तो ते उपचार यथाविधि उपयोगांत आणले असतां होतो; एकादा बस्ति, एकादे विरेचन किंवा वमन यांनी नव्हे हे विसरता उपयोगी नाही. एकाद्या प्रयोगाचा परिणाम तात्कालिक आणि स्थानीगुणाला पुरेसा झाला तरी सार्वदेहिक विकारांवर सांगितलेला उपयोग यथाविधि वस्तिविधि-विरेचनविधि वमनविधि यांचा व्हावयाचा. कोणत्याहि भागांत त्रिदोषांचे दूषित स्वरूपामुळे रोग झाला असतां तें