पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९१
रोगनाशक सामर्थ्य.

 द्रव्य, स्नेहन स्वेदनोपायांनीं कोठ्यांत परत यावे व मग शोधनानें काढून टाकावे अशी ही व्यापी शोधनचिकित्सा सामान्य स्वरूपाची आहे. आणि यामुळे सर्वसामान्य म्हणून महत्त्वाची परंतु विशिष्ट रोगाचे दृष्टीने कमी महत्त्वाचीहि म्हणावयास हरकत नाही. रोगचिकित्सेमध्ये सामान्य चिकित्सेहून विशिष्ट चिकित्सेलाच अधिक महत्त्व असून तें चिकित्सेचे रोगानुसार भिन्न प्रकारचें स्वरूप आहे. या सर्वसामान्य स्वरूपाच्या चिकित्सेविषयींहि एक गोष्ट विचारार्ह आहे ती ही कीं, शरीराचे एकाद्या भागांत रोग झाला असतां आणि उपचार सर्व शरीरावर सामान्यतः परिणामकारी असतां त्यांचा रोगी भागावर रोग नाशक उपयोग कां आणि कसा व्हावा ? या प्रसंगी सामान्यतः उपचारांचें

___________
रोगनाशक सामर्थ्य

विचारांत घेणें अवश्य आहे.
 कोणताहि रोग शरीराच्या विशिष्ट भागांत होतो याचें कारण, त्या भागांतील नैसर्गिक सामर्थ्य इतर शरीरांहून क्षीण झालेलें असतें हैं होय. ( स्ववैगुण्य ) या भागांत रोगोत्पादक द्रव्य रोगरूपी कार्य घडविते. आणि रोगामुळे त्या स्थानामध्ये रोगविनाशक सामर्थ्य निर्माण होतें. ह्मणजे रोगावस्थेमध्ये रोगी भाग शरीराचे इतर भागांहून अधिक क्रियावान् प्रतिक्रियावान् होतो. ( रोग प्रतीकारी सामर्थ्य कोठून येते. पा. १०५ पहा.) रोगविनाशाचे अधिक व अनैसर्गिक काम या भागाला करावयाचे असल्या कारणानें त्या ठिकाणी सर्व शरीरांतील शक्ति एकवटलेली असते, आणि याचमुळे सर्वसामान्य असे उपचारहि इतर शरीराहून रोगस्थानावर परिणामी होतात. रोग प्रतिकारार्थ प्रयत्नतत्पर झालेला रोगी भाग उपचारांतील मदतगार गुण प्रत्यय आणि अधिक प्रमाणांत आत्मसात् करतो. मात्र रोगाच्या अगदीं प्रथमावस्थेत ह्मणजे रोगोत्पादक दोषांचे आक्रमणानें रोगस्थानीय सामर्थ्य दडपून गेलें असून प्रतीकारार्थ प्रयत्न सुरू झाले नाहींत अशा वेळी उपायांत सफलता येत नाहीं. ( ही आमावस्था चिकित्स्य नाहीं. ) कोणत्याहि रोगाला कारणीभूत वातादि त्रिदोष असल्याने, या रोग कारणांचे सामान्यतः विनाशक असे जे उपचार ते सामान्यतः त्या त्या दोषापासून उद्भवलेल्या सर्व विकारांवर गुणदायी असतात. वायूमुळे कोणत्याहि शरीरभागांत रोग झाला असला तरी सामान्य वातनाशक उपचार त्या रोगांवर उपयोगी पडतात. असे असले तरी चिकित्साशास्त्रांत या सर्वसामान्य चिकित्सेहून