पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 निराळे धोरण अथवा वेगळी चिकित्सा महत्त्वाची मानण्यांत येते. जीमुळे या सामान्य चिकित्सेहून मुख्य व रोगस्थानांवर आणि विशिष्ट प्रकारच्या रोगांवर त्वरित आणि खात्रीने गुण येतो. ज्याप्रमाणे वाढलेले दुष्ट झालेले अथवा कुपित झालेले वातादि दोष शरीराचे निरनिराळ्या भागांत अनेकविध लक्षणे उत्पन्न करीत असतांहि या अवस्थेला रोग हें नांव नसून कुपित दोषांचा स्थानसंचय आणि स्थानाश्रय विकृतिविशिष्ट रोग या नांवाने ओळखण्यांत येते त्याचप्रमाणे असल्या विशिष्ट स्थानाश्रयी विकृतीवर किंवा रोगांवर विशिष्ट गुणाने म्हणजे प्रभावाने रोगनाशाचें कार्य करणारी चिकित्सा हीच महत्वाची समजावयाची. निदानांतील दोषांच्या स्थानसंश्रयामुळे चिकित्सेमध्ये उपचारांच्या स्थानाप्रभावाला महत्व आहे.चिकित्साशास्त्रांत या प्रकाराला व्याधिप्रत्यनीक अथवा रोगविपरीत चिकित्सा या नांवानें संबोधण्यांत येते, आणि द्रव्यगुणशाश्रयांत या विशिष्ट गुणाला प्रभाव हें नांव आहे, कोणताहि विकार उत्पादक कारणांच्या विशिष्टगुणप्रभावामुळे उत्पन्न होतो आणि अर्थातच रोगनाशहि पदार्थांतील विशिष्ट प्रकाराच्या गुणप्रभावानेच व्हावयाचा. असें असतां चिकित्से मध्ये दोषांचा संबंध कसा आणि कशासाठी यावा असा प्रश्न उपस्थित होत असून त्याचे उत्तर दोषांची शारीरिक व्याप्ती ध्यानी घेतल्याने मिळू शकेल. कोणत्याहि रोगकारक पदार्थांचा शरीरांत घडणारा परिणाम शारीरधातुंतील क्रियावान् अशा अणूंवर प्रथम होऊन नंतर रोगरूपीं कार्य घडून येतें आणि हेच क्रियाकारी अणु पुनः अविकृतावस्थेत आल्याने रोग नाश होतो. यामुळे निदान चिकित्सेत या असल्या अणूंचा म्हणजे वातादि त्रिदोषांचा विचार अपरिहार्य ठरतो.
 सामान्य अथवा विशिष्ट कोणत्याहि प्रकारची चिकित्सा, करीत असतां त्रिदोषांचा व्यवहार चिकित्सेचे स्पष्टतेसाठी केलेला असतो. ज्या रोगविनाशक पदार्थांचे गुणांमुळे रोगविनाश व्हावयाचा ते गुणहि या त्रिदोषांच्या विशिष्ट कल्पनेच्या अनुरोधानेंच आयुर्वेदांत वर्णिले आहे. आयुर्वेदाला त्रिस्कंध म्हणजे तीन प्रमुख शाखानीं युक्त असे विशेषण असून हे तीन स्कंध अथवा शाखा म्हणजे हेतु-कारणें, लींग- लक्षणे आणि औषध हे होत. या तीन शाखांनीच वैद्यशास्त्र पूर्णता पावते. आयुर्वेदाने जी शास्त्रीय उपपत्ति स्वीकारली आहे ती या तीनहि शाखांना सर्व सामान्य अशी असून तिचे एकवाक्यतेनें निदान चिकित्सा विषयींचा खुलासा होऊं शकतो.
 सामान्य स्वरूपाचे चिकित्सेमध्यें, त्रिदोषांचा उपयोग त्या त्या दोषाचे मुख्य गुणांचे पोटभेद सुचविण्यासाठी आणि विशिष्ट रोगनाशक