पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९५
रोगनाशक सामर्थ्य.

 विकृत स्वरूपामुळे होते त्या दोषाला विनाशक अशी चिकित्सा करणे अवश्य असते. ज्वर हा विकार त्वचेंतील वाढत्या उष्णतेचा व ती उष्णता आमाशयांतील - लध्वंत्रांतील- विकृतीमुळे असली तरी या विकृतींचे स्वरूप वातपित्तकफांचे अनुरोधाने निराळे असतें व म्हणून ज्वरनाशक असे औषध उपयोगांत आणीत असतां वातज्वरावर ज्वरनाशक व वातनाशक, पित्तज्वरावर ज्वरनाशक व पित्तनाशक इत्यादि पोटभेदांची चिकित्सेमध्ये जी स्पष्टता ती त्रिदोषांचे मदती शिवाय होत नाहीं कोणत्याहि ठिकाणी रोगोत्पादक विकृति म्हणजे स्रोतसांचा अवरोध- अभिसरणांत व्यत्यय हैं जें सामान्य कारण असते त्यामध्ये, रूक्षताजन्य, दाहजन्य आणि अभिष्यंदजन्य असे वायु, पित्त व कफ यांचे आधिक्याने पोटभेद असतात आणि या भेदांवर उपचार करीत असतां, वातनाशक, पित्तनाशक, कफनाशक उपचार याचा अर्थ, रूक्षता--क्षोभ घालवून रोगनाश करणें, दाहशामक गुणाने रोगनाश करणे व अभिष्यंदनाशक गुणाने रोगनाश करणे असे जे प्रकार संभवतात त्यांचा उल्लेख अनुक्रमे वातनाशक, पित्तनाशक व कफनाशक या नांवांनी करण्यांत येतो. रोगनाशक अथवा प्रभावी द्रव्याची निवड करीत असतां या धोरणाने करावी हैं सुचविण्यासाठी चिकित्सेमध्ये दोषांचा उपयोग करण्यांत येतो. चिकित्सेतील दोषांचा संबंध स्थूल स्वरूपाचे चिकित्सेचा पुरस्कर्ता नसून रोगनाशक द्रव्याचा उपयोग करतांनाहि त्यांतील सूक्ष्म भेद सुचविण्यासाठी आहे. निदानांत रोगस्थानीय विकृतीचा पोटभेद दाखविणारा, चिकित्सेत विकृतीभेदानुसार औषधीद्रव्यांचा पोटभेद सुचविणारा आणि द्रव्यगुणवर्णनांत द्रव्याचे विशिष्ट गुणकारित्वांतहि सूक्ष्मभेद स्पष्ट करणारा असा हा त्रिदोषांचा संबंध आहे. व या तीनहि ठिकाणी जे त्रिदोषांचें वर्णन येत त्याचा तात्विक अर्थ ध्यानांत घेऊन चिकित्सा केल्यास यशस्वी होते.
 त्रिदोषांचा ज्यांच्या ठिकाणी उल्लेख असेल तेथे त्यांचे स्वरूप मागें सांगितल्याप्रमाणे, गति पचन आणि संघटन हैं अविकृत आणि क्षोभ अभिताय अथवा दाह व अभिष्यंद हैं विकृत स्वरूपांतील अभिप्रेत असतें. हैं सामान्य तत्व अबाधित असतें. सर्व वर्णन या मूलभूत तत्वाला अनुस- रून केलेले आहे. आयुर्वेदांतील त्रिदोषांचे विवेचन म्हणजे निदानचिकित्सा - द्रव्यगुण--इंद्रियविज्ञान इत्यादि सर्व शास्त्रीय शाखांना एका विशिष्ट उपपत्तीमध्ये ग्रथित करणारे सर्वगामी सूत्र आहे. ही गोष्ट लक्षांत ठेवून त्यांचे तात्विक स्वरूप, पोटभेद निरनिराळ्या स्थानांतील व अवस्थांतील स्वरूप आणि कार्यें यांच्या अनुरोधाने विचार केल्यास योग्य अर्थबोध होऊं शकेल हे त्रिदोषवर्णन म्हणजे आयुर्वेदीयांच्या कांहीं तरी कल्पना नाहींत त्याचप्रमाणे केवळ त्यांच्या स्थूल स्वरूपाने कार्यभाग होण्यासारख्या