पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
आयुर्वेदांतील मूलतत्व.

 कल्पनाहि नाहींत. शास्त्र्याची ती विशिष्ट उपपत्ती असल्याने या औपपत्तिक भागाची योग्य व स्पष्ट कल्पना ध्यानीं घेऊन व्यवहार करावयास पाहिजे त्रिदोष काल्पनिक असल्या काल्पनिक समजुतीनें अथवा त्रिदोषांच्या स्थूल कल्पनेने आयुर्वेदीय निदान चिकित्सेचा बोध होणार नाहीं. प्राच्य शास्त्राच्या विशिष्ट प्रकारच्या विवेचन पद्धतीला अनुसरून सर्वशास्त्राची सर्वसामान्य उपपत्ती संक्षिप्त पण अबाधित आणि व्याधीस्वरूपाची असावयाची. तशीच त्रिदोष ही आयुर्वेदाची उपपत्ती आहे. हेतुलिंगोपधस्वरूपी स्कंधत्रायात्मक आयुर्वेदामध्ये त्रिदोषांचा सर्वत्र उपयोग असुन त्यामध्ये एकसूत्रीपणा उत्तम प्रकारें आहे. वातजन्यरोग वातनाशक उपचार इत्यादि उल्लेख ह्मणजे जर अर्वाच्य कल्पनेप्रमाणे कांहीं तरी अज्ञानाच्छादक अशी भाषा असतीतर, वातनाशक ह्मणून, सांगितल्यावर आणखी वेगळे स्निग्ध, शीत, उष्ण इत्यादि गुण, निरनिराळे रोग उत्पन्न होतात अथवा जातात असा उल्लेख गुणवर्णनांत आला नसता, प्रत्येक रोगाचें स्वतंत्र निदान सांगितलें नसतें. आणि प्रत्येक रोग व त्याचे अनेक पोटभेद यांवर असंख्य उपचार सांगितले नसते. असे स्वतंत्र वर्णन आहे. यावरूनच त्रिदोषांच्या सूक्ष्म ज्ञानाची अवश्यकता आयुर्वेदाच्या या उद्देशाला अनुसरून त्याचे सूक्ष्म आणि व्यवहार्य ज्ञान करून घेणे शास्त्रीय साफल्याला अवश्य आहे.
 आयुर्वेदांतील त्रिदोष है जीवनव्यापाराचे तात्विक वर्णन आहे. त्याला अनुसरून सर्व इंद्रियांचे नित्य व्यापार व त्यांत घडणारी विकृति यांचा बोध करून घेण्यासाठी हें तात्विक व व्यायी स्वरूप ध्यानांत घेणें अगत्याचे आहे. हें स्वरूप नीट ध्यानांत आल्यावर त्याचा सर्व शास्त्रीय व्यवहारांत उपयोग करून घेणे शक्य होईल. काल्पनिक ह्मणुन धिःकारणें किंवा स्थूलकल्पनेवरच भिस्त ठेवणें या दोनहि धोरणांनी आयुर्वेदाचे शास्त्रीय स्वरूप समजणे अशक्य आहे. निरोगी अवस्था रोगस्थिति आणि चिकित्सेतील उपचारांचे गुणवर्णन यामध्ये वातादित्रिदोषांचा जो दोष या नांवांनी उल्लेख येतो त्याचा व्यवहारी भाषेत तात्पर्य खाली दिल्याप्रमाणे होतो.

निरोगी अवस्थेतील वर्णन.

 वायूची - गति, संवेदना, हालचाल, अभिसरण ही कार्ये ( गति ) उत्सर्जन

 पित्ताची उष्णता, पचन पृथक्करण करणे हीं कार्ये. ( पचन )
  कफाची -संचय, संग्रह, संघटन, चिकटपणा, पोषण हीं कार्ये (संग्रह)
{

विकृतावस्थेतील.

 वायूची - रूक्षता, संकोच, -ताप-शूल हीं लक्षणें- ( क्षोभ )