पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

विरल स्वरूपी वायूच्या परिमाणूंच्य आश्रयाने प्रकाशत असते. पृथ्वी आणि आप यांचे परमाणू स्थूल अर्थात् मूर्त स्वरूपाचे असल्याने हस्तग्राह्य असतात. तेज स्थूल नाही अर्थात् तें हस्तग्राह्य नाही, नेत्रग्राह्यआहे. वायु हे तत्व अत्यंत विरल परमाणूंच्या स्वरूपाचे आहे. याचे परमाणु अत्यंत विरल असल्यामुळे त्यांत जडपणा नाही, व त्याकारणाने या तत्वाचा धर्म गति-चलन हा आहे. हे हातांत येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, स्पर्शाने ज्ञात होते. पण आकाश म्हणजे पोकळी अर्थात् पार्थिव व आप्य हे स्थूल स्वरूपाचें किंवा तैजस व वायव्य हे सूक्ष्मरूपी. कोणत्याच प्रकारचे पदार्थाचा परमाणूचा तेथे अभाव असतो. यामुळेच आकाशाला शून्य हे नांव आहे. पदार्थाश्रित अशा पंचतत्वांचे प्रतीत होणारे गुणः- पृथ्वीची स्थूलता, आप् आर्द्रता, तेज प्रकाशणे, उष्णता; वायु गति--चलन--आणि आकाश-अवकाश किंवा पोकळी. याप्रमाणे आहेत. ही सर्वव्यापी तत्वें निरनिराळी स्वतंत्र रीतीने उपलब्ध होत नाहीत. तर निरनिराळ्या पदार्थांच्या रूपाने मिश्र झालेली अशी मिळतात. सृष्टीतील प्रत्येक पदार्थात ही तत्वे असतात पण त्यांचे प्रमाण मात्र विभिन्न आहे. एरवीं सृष्ट पदार्थामध्ये विविधता आणि विचित्रता आली नसती. ज्या पदाथांत ज्या तत्वाचे आधिक्य असते त्यावरून त्या पदार्थाचा निर्देश केला जातो. जसे पार्थिव, आप्य, तेजस, वायव्य आणि नाभस. आकाशाचे न्यूनाधिक्य हे इतर चार तत्वांवर अवलंबून आहे.स्थूलता अधिक तितकें आकाश कमी आणि सूक्ष्मता अधिक असेल त्या मानाने पोकळी अगर आकाशाला वाढ त्या प्रमाणावर असते. असंख्य स्पष्ट पदार्थात स्थूल आणि सूक्ष्म असे मुख्य दोन प्रकार संभवतात. पृथ्वी आणि जल यांच्या अंशाधिक्याने झालेले स्थूल व तेज आणि वायु यांच्या अंशाधिक्याने झालेले सूक्ष्म. पृथ्वीवर पदार्थत्व पावलेले पदार्थ स्थूल पण मूर्त स्वरूपाचे आहेत व म्हणूनच त्यांना पार्थिव असें नांव देण्यांत आलेले आहे.

______________
पदार्थांची उत्पत्ति.


  कोणत्याहि पदार्थाचे उत्पत्तीला मुख्यत्वें धनद्रव्य अथवा स्थूलद्रव्य पाहिजे. एरवी पदार्थत्व नाही. व म्हणून सर्व पदार्थाना पृथ्वी अर्थात् स्थुलाणु, अवश्य. या उद्देशाने द्रव्याचे उत्पादनामध्ये मुख्याचार म्हणजे अधिष्ठान पृथ्वी आहे, असे सांगितले आहे. याप्रमाणे पृथ्वी हे द्रव्याचे अधिष्टान झाले. पृथ्वीचे परमाणु हे द्रव्याची सामुग्री झाली तरी ते एकत्र व्हावयाचे म्हणजे त्यांत आर्द्रता आलीच पाहिजे. आर्द्रता अगर