पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९७
रोगनाशक सामर्थ्य.

  पित्ताची-दाह, कुजणे, सडणे, ( दाह-अभिताप )
 कफाची - फाजील संग्रह, स्तब्धता, सूज, आर्द्रता, (अभिष्यंद )

गुणांचें वर्णन.

 वातनाशक - स्निग्धता, स्वेदन, मृदुता आणणे. (स्रोतोविकासी)
  पित्तनाशक - दाहशामक, कुजण्याला प्रतिबंधक ( शामक)
 कफनाशक - तीक्ष्णता वाढविणे, सूज घालविणें, संचय दूर करणे

( क्षोभक )

.  अशा प्रकारचे अर्थ प्रचलित भाषेच्या व्यवहारांत बोधक होतील. आयुर्वेदामध्ये या त्रिदोषांचे वर्धक, क्षोभक व शामक असे जे पदार्थगुण सांगितले आहेत ते याच धोरणाचे आहेत.

उष्णेनयुक्ता रूक्षाद्या वायोः कुर्वति संचयं ।
शीतेन कोपमुष्णेन शमं स्निग्ध व्यो गुणाः ॥ १ ॥
शीतेन युक्तास्तीक्ष्णाद्याश्च्र्यं पित्तस्यः कुर्वते ॥
उष्णेन कोपं मंदाद्याः शमं शीतोपसंहिताः ॥ २ ॥
शीतेनयुक्ताः स्निग्धाद्याः कुर्वते श्लेष्मणश्चयं ॥
उष्णेन कोपं तेनैव गुणा रूक्षादयः शमं ॥ ३ ॥

( अष्टांगह. सू. अ. १२ ).


 अर्थः- रूक्षादि गुण उष्णयुक्त झाले असतां वात वृद्धिकारक होतात. व याच रूक्षादि गुणांना शीत गुणाची मदत झाली असतां वायूचा प्रकोप ( रोगकारक अवस्था ) होतो. उष्ण आणि स्निग्ध या गुणांच्या मिश्रणाने वायूचा शम होतो.
 शीतयुक्त तीक्ष्णादि गुणांनी पित्ताचा संचय होतो. उष्ण गुणानें पित्ताचा प्रकोप होतो आणि शीत व मंद यांनी पित्ताचा शम होतो.
  स्निग्धादि गुण शीतयुक्त असतां कफाचा संचय, उष्णानें कफाचा प्रकोप व उष्णयुक्त रूक्षादि गुणांनीं कफाचा उपशम होतो.
 अशा प्रकारें वातादि दोषांचा सामान्यतः वाढ रोगकर्तृत्व आणि उपशम याविषयीं उल्लेख आहे. व वरीलप्रमाणे त्यांचा तात्पर्यार्थ आहे.
 यावरून ध्यानी येईल की चिकित्सेमध्ये रोगावर प्रभावी गुणाने उपयोगी पडणारी औषधेच मुख्य म्हणजे व्याधिप्रत्यनीक चिकित्सा महत्त्वाची परंतु त्यांतहि उत्पादक विकृतीचे पोटभेदांना अनुसरून उपचारोपयोगी पदार्थांचें तारतम्य या वातादिकांचे उल्लेखावरून ठरविलें जातें.

___________