पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

  (१५) या तीन अवस्थांतील पदार्थांना अनुक्रमे धातु, मळ, व दोष ही नांवें आहेत.
 (१६) शरीर स्रोतोमय ह्मणजे सछिद्र किंवा छिद्रमय आहे.
 ( १७ ) ह्रीं स्रोतसें कांहीं अंतर्वाही- अंतस्त्रावी व कांहीं बहिर्वाही बाह्यवाही अशीं आहेत.
 (१८) या स्रोतसांतून वरील सात पदार्थांना नित्यक्रांती - स्थित्यंतर घडामोड चालु असते.
 (१९) या क्रांतीला निरंतर वाहणें किंवा अभिसरण चालु असावे लागतें.
 ( २० ) त्यांत अडथळा आला की शरीर विकृत होतें.

 ( २१ ) या सर्व व्यवहाराचे कर्तृत्व दोषाकडे असतें व म्हणुनच

" वात पित्त शेष्माण एव देहसंभवेतः ॥

 वायु, पित्त व कफ हेंच देहोत्पत्ति व वाढ करणारे आहेत. असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे.

दोषविज्ञानांतील क्रम.

 (१) तीन दोषांपैकी कोणता दोष ?
 (२) दोषांचे मिश्रण असतां त्यांतील तारतम्य व प्राधान्य कोणाचे ?
 (३) दोषांचे गुणापैकी कोणते व त्यांचे तारतम्य ?
 (४) दोषांचे संबंध कोणत्या धातूंतील किंवा दूष्यांतील ?
 (५) दोषविकृती ज्या ठिकाणी झाली तेथील स्वाभाविक कार्य व त्याला अनुसरून विकृतीचे स्वरूप.
 (६) विकृति प्रथम कोणत्या स्थानांत व कोणत्या स्वरूपाची झाली. ?
 (७) विकृतीचा प्रसार कोणत्या मार्गाने व किती स्थानांवर झाला आहे.
 (८) रोगाला स्पष्ट स्वरूप कोणत्या ठिकाणी आले ?
 (९) दोष वाढून रोगकारी झाले की वाढ न होतां विकृति झाली ?
  (१०) मिश्र दोषांपैकी प्रथम विकृति कोणाची व आरंभक कोण ?
  ( ११ ) विकृतीच्या लक्षणामध्ये अधिक कोणाची व त्यांतील अधि- क बलवान कोणाची १
 (१२) दोष धातु व मळ किती विकृत झालें. १
( (१३) विकृतीची वाढ झपाट्याने होतें कीं मंद होतें ?