पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०१
रोगनाशक सामर्थ्य.

  (१४) कोणत्या वेळी व कोणत्या ऋतूंमध्ये विकृतींत वाढ अथवा कमिपणा येतो ?
 (१५) विकृती पूर्वीचे प्रकृतीतील स्वाभाविक दोष.
 इतक्या गोष्टी ध्यानी घेतल्या असतां रोगांतील दोषसंबंध नीट ध्यानी येईल.

 येणेप्रमाणे आयुर्वेदांतील वातादिदोषांची कल्पना, तिचें शास्त्रीयत्व आणि निदान चिकित्सा शास्त्रांतील कार्यक्षमव्यवहार्यता यांविषयीं खुलासा केला आहे. शारीरिक पदार्थांतील अतिसूक्ष्म अशा भागाची आणि या सूक्ष्म भागाचे शारीरिक क्रियाकर्तृत्वाची जी आयुर्वेदीयांची स्पष्ट कल्पना ते हे त्रिदोष होत. आणि प्राचीन आचार्यांची ही त्रिदोषा विषयींची कल्पना त्यांनी स्वीकारलेल्या विशिष्ट व पारिभाषिक विवेचनपद्धतीला अनुसरून विचारांत घेतां ती सत्य व पूर्ण शास्त्रीय कल्पना असल्याची खात्री पटून आयुर्वेदाचाच सिद्धांत मान्य होईल. तो हा कीं

विसर्गादान विक्षेपैः सोमसूर्यानिला यथा ॥
धारयति जगदेहं कफ पित्तानिला स्तथा ॥



22152

सातारा

समाप्त.