पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३
कफाचे कार्याचा खुलासा.

कफाचे स्निग्धादि गुण ज्या भागांत आधिक्याने आहेत त्यांन 'व्यप देशस्तु भूपसा' आधिक्यावरून कफाची मुख्य स्थाने निर्देश करावयाचा या सामान्य नियमानुसार कफाची स्थाने समजण्यांत येते. शरीरांत अशी स्थाने म्हणजे--
  उर: कंठशिरः क्लोम पर्वाण्यामाशयो रस ।
   मेदो घ्राणं च जिव्हा च कफस्य सुतरामुरः।।१।।[अ.ह सू स्था.],

कफाची मुख्य स्थाने.


 ऊर (छाती) कंठ, मस्तक, क्लोम,सांधे,आमाशय, रसधातु व मेदोधातु. ध्राणेंद्रिय व जिव्हा ही कफाची मुख्य स्थाने होत. या स्थानातहि ऊर हे कफाचे प्रमुख स्थान आहे. कारण या स्थानांमध्ये कफाचे सर्व स्निग्थादि गुण आधिक्याने असतात या मुख्य म्हणून सांगितलेल्या स्थानांतहि स्निग्धादि गुण सारखा नसून प्रत्येक स्थानांत त्याच्या रचनेप्रमाणे व कार्याप्रमाणे त्यांत फरक असतो हे सहज कळण्यासारखे आहे.


कफाची अविकृतावस्थेतील कायें.


  श्लेष्म्याची सर्वव्यापी आणि मुख्य कार्य--'स्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्वसंधिबंधक्षमादिभिः । देहं अनुगृण्हाति ' 'सम म्हणजे अविकृत स्थितीत श्लेष्मा असता शरीराचे ठिकाणी स्थिरता, स्निग्धता, संधिबंधन आणि क्षमा वगैरे मनाची शांतता या क्रियांनी देहावर अनुग्रह करितो. हे वर्णन स्थूल आहे म्हणजे शरीरांत सर्व ठिकाणी कमी अधिक प्रमाणांत वर लिहिलेल्या ज्या क्रिया त्यांना कारण श्लेष! एवढें सूचित केले आहे. स्थानविभागानुरूप त्याचे अंश ठरविणे हे तर्कावलंबी असून रोगज्ञान करून घेण्याला त्याची फारच जरूर असते. आतां मुख्य स्थानांत कफाची कार्ये काय व कशी होतात ते पाहूं.

______



कफाचे कार्याचा खुलासा.


 कफाचे मुख्य स्थान ऊर असे सांगण्यांत आले आहे. सर्व शरीरांत या स्थानाला अधिक महत्व आहे. कारण ज्या क्रियेवर शरीराचें अस्तित्व अवलंबून आहे आणि जीवरून जीविताची प्रतीति होते अशी श्वासोच्छ्वासाची क्रिया या स्थानापासून होते. उरस्थानांत असणा-या सूक्ष्मछिद्रयुक्त अशा मांसपिंडांच्या निसर्गप्रेरित संकोच प्रसरणामुळे ही क्रिया चालते हा संकोचविकास सुखाने व्हावा यासाठी स्निग्धादि गुणयुक्त पदार्थ या मांसपिंडांत असणे अवश्य आहे. या ठिकाणी उत्पन्न होणारा जो श्वसनवायु त्याच्या अखंड संचाराने फुफ्फुसांतील मृदुता कमी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होऊ नये ह्मणून