पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
आयुर्वेदातील मूलतत्वे.

श्लेष्म्याची अवश्यकता असून कुशल सृष्टिकर्त्याने त्याची योजना केली आहे. या इंद्रियाची रचनाच अशी नमुनेदार आहे की, आमाशयांत अन्नावर पचनक्रियेचा संस्कार होऊन जो रस तयार होतो तो नंतर यकृतात येतो व त्यावर यकृपिंडांत एक रसायनिक संस्कार घडून त्याला रक्तस्वरूप येते. (यकृत् रंजकं पितस्य स्थानम्-यकृत् हे रंजक पित्ताचे स्थान आहे. या पित्ताला रंजक हे नाव देण्याचे कारण याच्या संयोगाने रसाला रक्तता येते. 'रंजकं रसरंजनात् ').
  मग तेथून त्याचा सर्व शरीरात रक्तवाहिनींच्या द्वारें पुरवठा होतो. (युगपत् सर्वतोऽजस्रं देहे विक्षिप्यते सदा.) हा संस्कार होत असतां रसाचे रक्त बनत असता त्यांतून जो मळ निघतो तो उरस्थित कफांत भर घालतो. किंवा हा मल म्हणजेच उरस्थानांतील कफ होय. अशा प्रकारे शरीरांतील या निसर्गसंचालित रसायनशाळेंत मोठया कौशल्याने रक्ताची भट्टी चालू असतां फुफ्फुसांत जरूर असलेल्या या श्लेष्म्याची भर घालण्याची योजना केली आहे. यथाशास्त्र आणि प्रमाणमुक्त आहाराचे सेवन केले व निसर्गाला विरुद्ध नाही असा आहार ठेवला म्हणजे इतर धातूंबरोबर हा पदार्थहि योग्य प्रमाणांत उत्पन्न होतो. आणि आहारविहारांत अव्यवस्थितपणा आला की पचनक्रियेत अव्यवस्थितपणा येतो व त्यामुळे या कफाचे प्रमाणहि कमी अधिक होते. श्वासोच्छ्वास व शरीराचा आधार रक्त यांचे सम स्थितीला या कफाचे अविकृत स्थितीची अवश्यकता असून हृदय, इतर कफस्थाने यांतील कफाचं सामर्थ्य या कफावर अवलंबून आहे. ( रक्तांतून सर्व शरीराचे पोषण होते आणि तें रक्त उरस्थित कफाचे साम्याने सम राहतें म्हणून.) याला मुख्य मानून अवलंबक (अवलंबन करोति) असें नांव दिले आहे.

_______


कफ हा मळ की मुख्य शक्ति ?

<

  येथे अशी एक स्वाभाविक शंका येण्याचा संभव आहे की, कफ हा जर अन्नरसांतून निघणारा मल आहे, तर दोष अशी संज्ञा देऊन शरीराचे मुख्य चालकशक्तींत याची गणना कशी केली?
 मल या शब्दाचा सामान्य अर्थ टाकाऊ पदार्थ असा आहे आणि या अर्थावरून कफ हा जर टाकाऊ पदार्थ मानला तर त्याला दोषत्व कसे?
 कफः पित्तं मलः नेपु प्रस्वेदो नखरोमचा स्नेहोक्षित्वग्निशामोजो धातूनां क्रमशो मलाः ॥ १ ॥ कफ, पित्त, कान, नाक, नेत्र यांतील मळ; घाम, नखें, रोमा नेत्र, त्वचा इत्यादींवर असणारा स्निग्धपणा, आणि ओज हे क्रमाने रसादि धातूंचे मल होत. या मलांच्या यादीत