पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५
कफ हा मळ की मुख्य शक्ति ?

नखें, केश, घाम या बरोबरच कफ, पित्त इतकेच नव्हे तर ओजाची सुद्धां गणना केली आहे ओजाची व्याख्या देतांना तर 'ओजस्तु तेजो धातूनां शुक्रांतानां परं स्तन् ' ओज हे सर्व धातूंचे तेज आहे अशी दिली आहे. मग हे तेज मल कसा? तरी या ठिकाणी जो मल शब्द वापरला आहे त्याचा अर्थ इतकाच ध्यावयाचा की कोणत्याहि पदाथाचे पचन होत असता त्यांतून एक स्वच्छ द्रव्य (प्रसाद) व दुसरा अस्थच्छ् (विट्ट) असे दोन भेद निघतात. शरीरांतील सप्त धातु हेहि असेच बनतात. रसापासून रक्त, रक्तापासून मांस, इत्यादि तयार होत असतां पूर्व धातूचा प्रसाद पुढचा धातु आणि या पचन संस्कारांत शिल्लक राहणारे किट्ट--या पचनसंस्काराने धातु जसजसे स्वच्छ होत जातात तसतसे त्यांतून निघणारे किट्टहि अधिक स्वच्छच निघते. प्रसाद म्हणून तयार झालेल्या धातूहून मात्र तें कमी स्वच्छ असते इतकेच. शेवटचा शुक्र धातु तयार झाला म्हणजे ती अन्न रसाचीच शेवटची व निर्मळ अवस्था असें समजण्यांत येते.तरी पण त्याचेहि कार्य गर्भरूपानें परिणत व्हावयाचे असते. आणि त्यापूर्वी जें ओज शरीरावर दिसते त्याला मल गणण्यांत आले आहे. कारण या ओजापासून दुसरा पदार्थ निघण्याचा नसतो. याप्रमाणे कफ होय. अन्न किंवा ज्याला आहार म्हणावयचा तो पार्थिव आणि आप्य अशाच पदाथांचा असतो. या पदार्थाच्या रसांत वरील महत्भूत गुणांचे जे गुण असतात ते रक्त होतांना कमी होतात. आणि कमी होतात ते जातात कोठे ? यकृतांतील रंजक पित्ताचा संयोग झाला की त्यांत तैजस अंश वाढून रसांतून सूक्ष्म घटकांचे शोषण होऊन रक्तांत भर पडते. व स्थूल असे जें पार्थिव आप्य द्रव्य त्या आशयांत शिल्लक राहते तो श्लेष्मा होय. या कफाचे गुण म्हणजे पृधि व अप यांच्या मिश्रणाचे हे मागील विवेचावरून लक्षात येईलच. रक्त बनत असत. याला रक्तापेक्षेन मलता येते. म्हणून मल या नावाने याचा उल्लेख केला आहे. शिवाय या पदार्थस्वरूपी कफाची, ज्या वेळी तो काढून टाकावा लागतो, कार्य:कारी शक्तिहि अदृश्य अशा स्निग्धता, शीतता इत्यादि गुणांत असते व हे गुण म्हणजे दोष होत. खोकल्यांतून पडणारा कफ किंवा वांतीतून पडणारे पित्त हेच दोष नव्हत तर त्या पदार्थात दोषांचे गुण पुष्कळ प्रमाणांत असून त्या त्या आशयांत ते आपले काम करतात. व्यापिनः म्हणून ज्यांचे वर्णन केले ते स्निग्ध शीतादि गुण होत. हे स्पष्ट करण्यासाठी कफ पित्तांना मल अशी संज्ञा दिली असताही खोकल्यांतून पडणारा कफ किंवा या वांतीतून पडणारें पित्त हेच आयुसंमत दोष अशी आपली काल्पनिक समजूत करून काही आक्षेपक आयुर्वेदावर अप्रयोजकपणाचा शेरा देतात. हा अप्रयोजकपणा कोणाचा?