पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

कफाधिक्याचे दुसरे स्थान कंठ श्वासोच्छ्वासाचा व अन्नपानाचा हा मार्ग आहे. खालेल्या अन्नांत आर्द्रता व मृदुता येऊन ते न टोचता अमाशयांत उतरावे यासाठी कंठाचे ठिकाणी हा कफ असतो. कफाचे स्निग्धपणामुळे अन्नाचा प्रवेश होतो. त्याचप्रमाणे श्वासाचा नेहमी या ठिकाणी संचार असतो. येथे इतर ठिकाणांहून स्निग्धता अधिक नसत्यास या भागाचे शोषण होऊन त्यांत कोरडेपणा येईल. मस्तक हे कफाचे स्थान सांगितले आहे. आणि येथे असणारा कफ इंद्रियांची तृप्ति करणारा असून त्याचे नांव तर्पक असे आहे. मस्तक मेंदूचें स्थान असून त्याचे ठिकाणी शांतता असतां इतर इंद्रियेहि शांत असतात. कक हा शीतवीर्य असल्याने मस्तकांत राहून मेंदूला शांत ठेवितो व त्यामुळेच याला तर्पक असें नांव देण्यात आले आहे क्लोम या स्थानांतहि श्लेष्म्याचा शीत गुण हाच आपल्या वीर्याने शांतपणा राखतो. व कोठ्यांतील व रक्तातील जलांश कमी झाला म्हणजे तहान वगैरे लक्षणे उत्पन्न होतात. शरीरांत प्रत्येक इद्रियाचे जे कार्य होते आणि ते घडवून आणण्यासाठी जी शक्ति लागते तिचा पुरवठा ज्या भागांतून होतो त्या भागाला त्या शक्तीचा आशय असे समजण्यांत येते. या आशयांत इतर भागांहून ती शक्ती अधिक प्रमाणांत असते त्याप्रमाणे त्या जलांशाचा पुरवठा करणारा कोम हा आशय होय. संधीचे ठिकाणीं कफाचें आधिक्य असून आपला चिकटपणा ह्या गुणाने सर्व संधीचे श्लेषण एकमेकांना चिकटवून ठेवण्याचे कार्य हा करीत असल्याने त्याला श्लेषक असें नांव आहे.आमाशयांतील कफाला क्लेदक असें नांव आहे.सर्व प्रकारचे अन्न आमाशयांत गेल्यावर त्याचे पचन होण्यापूर्वी सर्व घटक विरघळून एकरूप व्हावे लागतात.व यासाठी त्यांत पातळपणा यावा लागतो. हे पातळपणा आणण्याचे काम सोमगुणप्रधान असा कफ करितो. अन्न आमाशयांत गेले की त्या इंद्रियांत जे शीतस्निग्धादि श्लेष्म गुण आहेत त्यांनी अन्नाचे घटक पातळ स्वरूपांत मिळतात. व मग त्याचे शोषण होते. ही क्रिया नीट न झाल्यास पचन नीट होत नाही. रसधातु हा पार्थिव आप्य या आहार पदार्थातून निघालेला सार भाग आहे. अर्थात त्यामध्ये या दोहोंचे गुण असणार आणि श्लेष्माहि त्याच गुणांचा आहे. सर्व शरीरावयवांचे पोषक घटकांचे हे संमिश्रण आहे. हा रस निरनिराळ्या अवयवांतून फिरत असतां त्या त्या भागांतील पचनशक्ति आपापले अंश शोषून घेते. मेदोधातूंत कफाचा स्नेह हा गुण विशेष आहे. आणि केशवाहिनीमध्ये वगैरे याचे योगाने मार्दव राहते. घ्राणेंदियांत श्वासोच्छवासाच्या घर्षणाला सहन करील अशी मृदुता ठेवणारा श्लेष्मा अवश्यक असून, जिव्हेवर टाकलेल्या पदार्थात जी आर्द्रता उत्पन्न होते आणि जीमुळे रसज्ञान होते असें चर्वणाने त्या पदार्थात