पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७
कफाच्या लक्षणांचा खुलासा.

जो एक प्रकारचा द्रव मिश्र होतो व ज्याच्या योगानें खालेला पदार्थ घशांतून खाली जाण्यालायक बनतो हे कार्य करणारा श्लेष्मा होय. श्लेष्म्याच्या त्या स्थानांत राहणारे स्निग्धादि गुणांमुळेच हे कार्य होतें. ही कफाधिक्याची स्थाने व त्यांची कार्ये झाली. ह्या स्थानांपैकी कोठे स्निग्धता अधिक तर कोठे शीततेमुळे कार्य घडते. पार्थिव परमाणु हैं द्रव्य आणि त्यांत अप् तत्वाचा मिलाफ झाल्याने हे गुण निर्माण झाले आहेत. आणि त्या अप् तत्वाच्या म्हणजे आर्द्रतेच्या प्रमाणानुरूप प्रत्येक ठिकाणी त्याचे स्वरूप निराळे आहे म्हणजे या श्लेष्मशक्तीला कारण जलतत्व आहे आणि म्हणूनच शरीराच्या चालकशक्तींत श्लेष्मा ही शक्ति सोमविशिष्ट अहे असे सांगितले आहे. शरीराच्या रचनाविशेषाचे सामथ्योने वाढेल्या पदार्थातूनच त्या त्या आशयाचे ठिकाणी या श्लेषक शक्तीची जरूर ती भर पडत असते. व त्यामुळे शरीराच्या क्रिया सुरळीत चालतात.

__________


कफाची विकृतावस्थेतील कायें.


  कफ विकृत झाला असतां तो काय व कशी विकृति उत्पन्न करतो ते पाहूं?
 आयुर्वेदांतील कफाची विकृतावस्थेतील कार्यें म्हणजे कफजन्य लक्षणे मुख्य वीस सांगितली आहेत. तीः-तृप्तिश्च, तंद्रा च, निद्राधिक्यं च, सौमित्यं च, गुरुगात्रता च, आलस्यं च, मुखमाधुर्यं च, मुखस्रावश्च, उद्गारश्च, श्लेष्मोदिरणं च, मलस्याधिक्ये च, कंठोपलेपश्च, बलासच, हृदयोफ्लेपश्च, धमनीप्रतिचयश्च, गलगंडश्च, अतिस्थौल्यं च, शीताग्निता च, उदर्दश्च, श्वेतावभासता च, श्वेतमूत्रनेत्रवर्चस्त्वं च इति विंशतिः श्लेष्मविकाराः, कफ विकृत झाला असतां म्हणजे त्याची वाढ झाली असतां मुख्यतः ही लक्षणे उद्भवतात. निरनिराच्या भागांत कफ हा निरनिराळ्या कारणांनी आणि अनेक प्रकारांनी दूषित होऊन अनेक विकार उत्पन्न करितो. विकार कोणत्याहि भागांत झाला तरी कफाचे विकारांत या वीस लक्षणांपैकी काही असतातच. व्या आशयामध्ये प्रथम विकार उत्पन्न होतो त्याचे समीपवर्ति लक्षणांचा समावेश विकारांत होतो. कफापासून ही लक्षणे कशी उद्भवतात, याचा विचार करूं.

__________


कफाच्या लक्षणांचा खुलासा.

 सदर लक्षणांत तृप्ति हें प्रथम सांगितले आहे. 'तृप्ति म्हणजे भोजनावांचून भोजन केल्याप्रमाणे तृप्ति वाटणे. संपूर्ण शरीराची वाढ़ भोजनाचे सुव्यवस्थित पचनाने होते. आणि त्याचे अव्यवस्थित