पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१
कफाच्या लक्षणांचा खुलासा.

गीण शीतता कमाने कशी उत्पन्न होते हे पहावयाचे. ही शीतता त्वगिंद्रियाचे ठिकाणी प्रतीत होत असते. अर्थात् या प्रसंगी कफ वाढला असें म्हणणे म्हणजे त्वचेत वाढला हे उघड होत आहे. त्वचेतील उष्णता रक्तावलंबी आहे. आणि रक्ताची उष्णता अन्नरसावर अवलंबून आहे. आहारामध्ये पार्थिव व आप्य पदार्थ अधिक आले म्हणजे तद्विशिष्ट रस तयार होतो. आणि असा रस रक्तांत मिळाला की, त्यांतील जडशीत गुणामुळे सात्मीकरण न होतां उलट रसांतील पूर्वीची उष्णताच कमी होते. उष्णतेच्या हीनत्वामुळे रक्ताचे अभिसरण मंदावते. व त्यांत आर्द्रता--जलांश--वाढून त्वचेतील उष्णता कमी होते व त्यायोगें स्तैमित्य हे लक्षण उत्पन्न होते याला रस धातूंत कफाची वाढ किंवा रसाजीर्ण हे कारण आहे. 'गुरुगात्रताच' अंग जड होणे. वरील प्रकारे रक्ताचे अभिसरण आणि रस धातूचे पचन त्यांतील पार्थिव व आप्य या अंशांचे आधिक्यामुळे नीट न झाल्याने व असल्याच रक्ताने सर्व धातूंचे पोषण होत गेल्यास, शिवाय अशा प्रकारच्या रसांत एक प्रकारचा चिकटपणा येतो. त्याने शरीरांतील सूक्ष्म स्त्रोतसांचा संरोध होऊन मलांचा नीट उत्सर्ग होत नाही. अशा स्थितीत मलाचा उत्सर्ग होत नाही व पार्थिव आप्य पदार्थाची म्हणजे गुरुत्वविशिष्ट घटकांची शरीरांत भर, मग जडता येणे स्वाभाविक आहे. आणि हे गुण कफाचे असल्यामुळे यांचे कर्तृत्व कफाकडे असल्याचे सांगितले आहे. व सदर लक्षण तंद्रेप्रमाणेच सर्व शरीरव्यापी आणि एकावयवव्यापी असे होऊ शकतें. आलस्यं च-आळस म्हणजे 'समर्थस्याप्यनुसाहः कर्मण्यालस्यमुचते काम करण्याची अंगीं ताकद असतांहि तें करण्याविषयी उत्सुकता नसणे म्हणजे आळस होय. हा उत्साहाचा -हास ज्ञानतंतु अगर मज्जातंतु यांचे विकृतीमुळे होतो तंद्रा उत्पन्न करणारी विकृति अधिक प्रमाणांत असते व आळस करणारी थोडी कमी येवढाच फरक.बाकी दाहोंचेहि स्वरूप एकाच जातीचे. आळसालाच थोडे व्यापक आणि टिकाऊ रूप म्हणजे तंद्रा होय. मुखमाधुर्यं च, मुखास्त्रावश्च, ही दोन लक्षणे रसनेंद्रियावर होणारी आहेत. अर्थात् यांना त्या ठिकाणचे कफाची वाढ कारण आहे हे उघड होय. जिव्हेचे ठिकाणी जो कफ असतो त्यांत स्निग्धता, क्ष्लक्षणता इत्यादि गुण अल्प असून शीतता-आर्द्रता हाच गुण विशेष प्रमाणांत आहे व यामुळेच कोणताहि पदार्थ जिव्हेवर ठेवतांच त्यांत आर्द्रता येऊन त्याचे रसाचे ज्ञान होतें. कफमय आहारामुळे झालेल्या कफविशिष्ट अन्नरसापासून इतर शरीरविभागांप्रमाणेच जिव्हेवरही बुळबुळीतपणा येतो. ती चिकट होते, आणि तींतील ज्या सूक्ष्म स्रोतसांनी रसाचे परिज्ञान होते ती भरून जातात व कोणताहि पदार्थ खाला असता त्यांत रसनेद्रियाचे