पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
कफाच्या लक्षणांचा खुलासा.

कारक पार्थिव व आप्य गुणंविशिष्ट पदार्थांनी जो रस तयार होतो, ज्याला आम या नांवाने संबोधण्यात येते त्यांत नेहमींचा पातळपणा नसणे स्वाभाविक आहे. आणि या घनतेमुळे त्याचे अभिसरण मंदावते. त्यांतील स्निग्धपणा आणि चिकटपणा यामुळे शिरांना लेप बसतो व त्यामुळे मलोत्सर्ग होत नाही. अशा रीतीने धमनीत जड स्निग्ध असा रस राहिल्याने मलोत्सर्ग नसल्याने त्या भरल्यासारख्या वाटतात.
 'गलगंडश्च' कंटस्थित रसपिंडामध्ये जड, स्निग्ध, शीत अशा पदाथांनी बनलेल्या रसधातूचे पचन व अभिसरण नीट न झाल्यामुळे संचय होऊन त्या पिंडाची वाढ होते व पिकण्याच्या-पू होणाऱ्या क्रियेला सुरुवात होते. कंठ हे कफरथान आहे, त्यामध्ये कफाची वृद्धि झाल्याने समीपवर्ती रस-पिंडावर परिणाम होऊन हा विकार होतो, व यासाठी ह्या विकाराचे उत्पत्तिकारण कफ विकृति आहे.
 'अतिस्थौल्यं च 'शरीरस्थूल होणे. मेदोधात्वाश्रित कफाचे वाढीमुळे हे लक्षण उत्पन्न होते. मेदामध्ये कफाचे गुणापैकी स्निग्धता आधिक्याने आहे. आणि त्या गुणाला वाढविणारे अर्थात् स्निग्ध पदार्थ अधिक आहारांत आल्याने मेदोधातूची अभिवृद्धि होते. ओषटपणामुळे सूक्ष्म स्रोतसें बंद होतात व पुढील धातूंची वाढ बंद होऊन सर्वांचा परिणाम मेदोधातूच्या फाजील वाढीतच होतो. हा परिणाम शरीरांत असणाऱ्या विशेष सपाटीच्या अशा भागांवर पोट, स्तनप्रदेश, कटिपश्चात्भाग इत्यादींवर होतो आणि शरीर स्थूल दिसू लागते.
  'शीताग्निता च' म्हणजे अग्निमांद्य. जठराग्नि आणि धात्वग्नि म्हणजे आमाशयांतील व धातूंतील उष्णता कमी होणे हे कफाचें सामान्य लक्षण स्पष्टच आहे. अशा प्रकारची विकृति झाली असतां अन्नाचे व धातूचे पचन नीट होत नाही व हा आम शरीरात फिरत असतां त्वचेतील त्याचे अभिसरण नीट न होतां जागोजाग संचय होतो. हा थोडा वेळ टिकणारा असतो. व अंतर्बाह्य दीपन पाचन औषधांनी त्याचा नाश होतो. त्याला उदर्द म्हणतात. रसधात्वाश्रित कफाचे आधिक्य याला कारण आहे.
 श्वेतावभासता ' श्वेतात्रनेत्रवर्चस्वं च ' म्हणजे त्वचा, नेत्र, मूत्र, मल इत्यादींवर पांढूरता येणे. फिकटपणा येणे. वर सांगितल्याप्रमाणे अन्नरस कफप्रधान व पार्थिव्य आप्य घटकविशिष्ट तयार झाला म्हणजे ज्या पित्ताच्या किंवा यकृत् पिंडांतील पाचक रसाच्या मिश्रणाने त्याला रक्तता-तांबडेपणा येतो. त्याचे न्यूनत्वामुळे अन्नरसाचे यथाविधि पचन न होऊन रक्तताहि नीट येत नाही. व त्यामुळे रक्ताच्या रंगाने त्वचेच्या पृष्ठभागावर दिसणारी तेजस्विता कमी होऊन फिकटपणा येतो. अन्नांतील जलांशावर उष्णतेचा पुरेसा संस्कार न झाल्याने