पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
आमुर्वेदांतील मूलतत्वे.

मलमूत्रांत पांढरेपणा, डोळ्यांतील व नखांतील लाली रक्तावलंबी असते ती रक्ताचेच फिकटपणामुळे कमी होते यामुळे ही लक्षणे कफकृत मानली आहेत. कफाची ही वीस लक्षणे होतात. विकार कफाचे म्हणून सांगतांना ज्या भागांत कफाच्या गुणांची व्यस्त अगर समस्त रूपाने वाढ होते त्या भागाच्या नैसर्गिक क्रियेत कफाचा परिणाम दिसून येणे येवढेच धोरण आहे. प्रत्येक इद्रियाची रचना आणि कार्य हे भिन्न आहे. आणि त्याला अनुसरून विकृति व्हावयाची. वर सांगितलेली लक्षणे ही शरीरांत स्निग्धादि गुणविशिष्ट कफ ज्या भागांत आधिक्यान आहे, त्या स्थानांतील वाढ दर्शविणारी आहेत. शरीराची इंद्रियें परस्परावलंबी आहेत. एकाचे कार्य बिघडले असता त्याचा परिणाम दुसन्यावर होतो. अशा रीतीने विकार वाढत जातात. एकाद्या आशयांत एकाद्या गुणाची वाढ होते, परंतु इतर इंद्रियांवर त्याचा परिणाम होत नाही त्यावेळी त्या दोषाची वृद्धि एवढेच कार्य असते. परंतु उपचारांचे अभावी किंवा कारणाचे सामर्थ्याने वाढ चालू राहिल्यास तिचा परिणाम दुसऱ्या इंद्रियावर होतो. त्यावेळी रोग म्हणून ओळखण्यांत येते. वर लिहिलेली लक्षणे ही कफाची त्या त्या स्थानांतील वाढ दाखविणारी आहेत. या वाढीमुळे उन्मार्गगामी कफ कोणते विकार करतो त्याचा विचार करावयाचा.

_________


कफामुळे होणारे काही विचार.


  रोग शब्दाचा अर्थ शरीराला त्रास देणारी विकृति असा आहे. अशा विकृतीचे सामान्य कारण म्हणजें शरीरातील कोणत्याही भागाचें न्यूनाधिक्य-विषमता--येणे हे आहे. 'रोगस्तु दोप वैपम्यं' किंवा 'धातुवैपम्यं रोगः' धातु ह्मणजे शरीरातील रक्तादि स्थूल व तन्निष्ट शक्तिस्वरूपी वातादि सूक्ष्म द्रव्यांत न्यूनाधिक्य येणे म्हणजें रोग होय. अशी रोगाची व्यापक व्याख्या आहे. आणि सामान्यतः जरी ही विषमता रोग नावाने संबोधिली जाते, तथापि वैद्यशास्त्रामध्ये उपचाराचे सोयीसाठी रोगसंज्ञा एका निराळ्याच अवस्थेला योजिली आहे. किंवा एका विशिष्ट अवस्थेमध्येच रोगवर्णन संभवते. ती अवस्था अशी की, जीमध्ये नैसर्गिक देहधर्माहून विभिन्न अशी विकृति दृग्गोचर होऊन शरीराला त्रास भोगावा लागतो. उदाहरणः--कफस्थानामध्ये मुख्य जें ऊर तेथें कफाची वाढ झाली असता त्या स्थितीत 'हृदयोपलेपः ' हे स्थानसंभाव्य लक्षण उत्पन्न होईल. व कफाचे सामान्य गुरु गुणाचे वाढीने छाती जड--भरल्या सारखी--वाटेल. या अवस्थेत शरीराला थोडाफार त्रास होतोच. आणि यासाठी 'रुक सामान्यात् ' रोग हे