पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
२७
कास किंवा खोकला.
कास किंवा खोकला.

   श्वासाप्रमाणेच कासः- याचेंहि उत्पत्तिस्थान उरस्थानच आहे. हे दोनहि विकार एकाच प्राणवायूचे सुखसंचारामध्ये व्यत्यय आल्याने होणारे आहेत. या प्राणवायूचे प्रतिलोमनाला कारण फुफ्फुस पिंडाचे आश्रयाला असलेला कफसंचयच असतो. आणि असें असता श्वास आणि कास हे विकार निराळे होतात, याला कारण, कासविकारांत आणखी श्वासाचे संचारपंथांतील अवयवांतराची दुष्टि हे असते. श्वासविकार ज्या अवस्थांमध्ये उत्पन्न होतो त्या अवस्थेत कफदष्टीची व्याप्ति उरस्थानांतच मर्यादित असते. व ज्यावेळी असे एकादे कारण घडून येते की, त्यामुळे उरस्थानाबरोबरच श्वासमार्ग-कंठ- हाहि दूषित होतो. त्या भागांत कफाची वाढ झालेली असते. त्यामुळे उरस्थानांत कफसरोधाने प्रतिलोम झालेल्या वायूचे घर्षण श्वासमार्गाला सहन होत नाही आणि त्या ठिकाणी शब्दवाहक स्रोतसांतील त्या आघातामुळे एका विशिष्ट स्वरूपाचा धनिस्वरूप खोकला उत्पन्न होतो. कंठप्रदेशांतील ही विकृति सुचविण्यासाठी आयुर्वेदीय कासनिदानांत,

पूर्वरूपं भवेत्तेषां शूकपूर्णगलास्यता।
कंठे कंडूश्च भोज्यानामवरोधश्च जायते ॥१॥


कंठात तूस भरल्याप्रमाणे वाटणे, खाज सुटणे इत्यादि लक्षणे दिली आहेत. कोणत्याहि विकाराचे कर्तृत्व दोषावर आरोपित करण्यापूर्वी विकारी स्थानांतील दोषाची विकृति येवढें ध्यानी घेऊन विकाराला सुरुवात कोणत्या स्थानांतील कोणत्या दोषांमुळे झाली, याचा तारतम्यपूर्वक विचार करणे अवश्य असते. या उद्देशाचे स्पष्टीकरणासाठी

संचयं च प्रकोपं च प्रसरं स्थानसंश्रयं ।।
व्यक्तिं भेदं च यो वेत्ति दोषणां स भवेत् भिषक् ॥


दोषांचा संचय, प्रकोप, प्रसार आणि विशिष्ट स्थानाचे आश्रयाने होणारे सर्व विकार त्यांचे ज्ञान ज्याला असते तोच वैद्य समजावा. असा आयुर्वेदीयांचा अभिप्राय आहे. या श्वास कासाप्रमाणे प्रतिविकारांत आशयदुष्टीचा फरक असतो, आणि त्याचे ज्ञान अवश्य आहे. त्याशिवाय उपायांना शास्त्रीयत्व येणार नाही.

 श्वासाचे संप्राप्तीमध्ये, 'कासवृध्याभवेतू श्वासः' खोकला वाढल्याने श्वास उत्पन्न होतो, असे सांगितले आहे. व त्यामुळे स्वाभाविकपणे अशी शंका उद्भवते की, या दोन विकारांमध्ये, दोषांची अधिक व्याप्ति कोणत्या विकारांत समजावयाची ? दोनहि विकारांत कफाची दुष्टि हैं खरें. तथापि श्वासविकारांत उरस्थान दूषित असते. आणि कासविकारांत कंठ विशेषे दूषित असतो असा यांत फरक आहे. मात्र त्याबरोबर