पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 हेहि ध्यानात ठेवणे अवश्य आहे की, कासविकारांतील उदरस्थानीय कफविकृतीहून श्वासांत ती अधिक असते. व उर हे कफाचे मुख्य स्थान असल्याने तेथील विकृति कफविकारांत विशेष सामर्थ्याची, तीमुळे हृदयस्थ व्यानवायूचा क्रियेत मांद्य येऊन, चालणे, बसणे, उठणे इत्यादि व विशेषे रसविक्षेप (गत्यपक्षेपणोत्क्षेप निमेषोन्मेषणादिकाः ।।) या क्रियांत विकृति-मांद्य-श्वासविकारांत अधिक प्रमाणाने येते. हृदयस्पंदन हे सर्व जीविताला आधारभूत आहे. आणि श्वासविकारामध्ये तें कासाहून ज्यास्त दूषित होते. या कारणाने कासाहून श्वासांतच दुष्टि अधिक असते. याकरतांच श्वासविकार महत्वाचा मानला गेला आहे.

कामं प्राणहरारोगा बहवो न तु ते तथा॥
यथा श्वासश्च द्दिका च हरतः प्राणमाशु च ॥१॥


प्राणहारक रोग अनेक आहेत. तथापि हिक्का (उचकी ) व श्वास याप्रमाणे शीघ्र प्राणहारक कोणी नाही. आता हे गृहीत धरल्यावर 'कासवृध्या भवेत् कासाः' या वाक्याचा उपयोग व तात्पर्य काय ? हा प्रश्न राहतोच, उत्पत्तीच्या करणांचा निर्देश करताना, घशांत धूर, धूळ वगैरे जाणे, अधिक व्यायाम इत्यादींचा समावेश केला आहे. (धूमोपगातात्, रजतस्तथैव व्यायाम रूमान्न निपेवणाच ). ही कारणे आगंतु स्वरूपाचा खोकला उत्पन्न करणारी आहेत, हे सहज ध्यानी येईल, घशांत धूर शिरला व त्याने खोकला आला ही आगंतु विकृति झाली. हा आगंतु कास वाढल्याने परंपरेनें सान्निध्यामुळे उरस्थान दूषित होऊन त्यामुळे श्वास उद्भवेल म्हणजे श्वासाचे कासवृद्धि हे कारण होणे शक्य आहे. मात्र कासाचा श्वास हा उपद्रव नव्हे अर्थात् विकृतीचे दृष्टीने महत्व श्वासालाच राहते. या दोन विकारांस स्थानदुष्टीचे स्पष्टतेसाठी आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये संप्राप्तीकडे पाहिल्याने स्पष्टतया दोघांचे स्वरूपांतर दिसून येते ते असें:--

श्वासः-- मारुतः प्राणवाहीनि स्रोतांस्याविश्य कुष्यति ॥
उरस्थः कफमुद्धय हिकाश्वासान् करोति सः१ (चरक)

  उरस्थानांतील वायु कफाला कुपित करून-उन्मार्गगामी करून प्राणवाहक स्रोतसांमध्ये प्रवेश करितो व त्यामुळे श्वास आणि उचकी हे विकार संभवतात. कासामध्ये:--

अधः प्रतिहतो वायुः उर्ध्वस्रोतः समाश्रितः ॥
उदानभावमापन्नः कंडे सक्तः तथोरास ॥१॥ (चरक)

  संचारपांत अधोमार्गी प्रतिबद्ध होऊन ऊर व कंठ यांत संग पावून-अडकून-कास उद्भवतो. या संप्राप्तीमध्ये, श्वास आणि कास यांमध्ये, अनुक्रमें ऊर व कंठ यांतील प्रधान दुष्टीचा उल्लेख आहे. कोण