पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 कोप होतो. (हीमत्वात् वा घृणित्वात् वा भयात् वा वेगमागतं ।। तस्य संधारणात् वायुः प्रकापमापद्यते ॥(चरक.) शुक्रादिकांचे क्षयाने कोप वायूचाच. (च. नि. स्था. अ. ६) त्याचप्रमाणे अन्नपानविधीच्या त्यागानहि मुख्यत्वे वायूच दूषित होतो. अशारीतीने क्षयोत्पादक मुख्य कारणे जर मुख्यत्वे वायूलाच कुपित करणारी आहेत तर कफानें क्षय होतो याला आधार कोणता ? असा प्रश्न पुढे येतो. राजयक्ष्मा या विकाराची संप्राप्ति देतांना ‘कफप्रधानोपस्तु रुद्धेषु रसवमसु' कफ ज्यांत प्रमुख आहे अशा दोषांनी रसवाहिनींची मुखें रुद्ध झाली असता हा रोग उत्पन्न होतो असा उल्लेख असून त्याबरोबरच ' अतिव्ययायिनो वापि क्षीणे रेतस्यनंतराः ॥ क्षीयंते धातवः सर्वे ततः शुष्यति मानवः ॥ १॥ अति मैथुनाने शुक्र क्षीण झालें असतां अस्थि, मज्जा, मांस इत्यादि धातु अंतराभावामुळे क्रमशः क्षीण होऊन क्षय (शोप) विकार होतो. असें दुसरोहि कारण दिले आहे. यावरून वायूनें क्षयसंभव उघड आहे. अष्टांग हृदयामध्ये तर "तैरुदीर्णोऽनिलः पित्तं कर्फ चोदीय सर्वतः" वरील हेतुचतुष्टयाने कुपित झालेला वायु कफ व पित्त यांना

(एकः प्रकुपितो दोषः सर्वानेय प्रकोपयेत् ।।)

या न्यायाने कुपित करतो असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे 'त्रिदोषो जायते यक्षा गदो हेतुचतुष्टयात्' या हेतुचतुष्टयाने त्रिदोष ज्यांत आहेत असा हा विकार होतो, असेंहि वचन आहे ही सर्व वचनें ध्यानी घेतली म्हणजे प्रथमच अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविकआहे की, काही ठिकाणी वायूने व काही ठिकाणी त्रिदोषांनी क्षय किंवा राजयक्ष्मा होतो असे सांगीतले असतां राजयक्ष्मा कफाने होतो कसा व त्याला आधार काय ! या शंकेच्या समाधानासाठी क्षयाचे संप्राप्तीचे सूक्ष्मदृष्टया अवलोकन केले पाहिजे. रोगनिदानामधे संप्राप्तीलाच अत्यंत महत्त्व आहे. कारण स्पष्ट झालेल्या रोगाचा स्पष्ट इतिहास म्हणजे संप्राप्ती होय. रोग होण्याला कारण कोणत्या स्वरूपाचे झाले, त्याने कोणता दोष प्रथम बिघडविला, प्रथम कोणत्याआशयांत किंवा स्थानांत विकृति उद्भवली, व तिचा कसकसा प्रसार होऊन कोठे विकार सष्ट झाला ह्याची साग्र माहिती झाल्याविना उपचार यशस्वी होणार नाहीत. आणि ही माहिती म्हणजे संप्राप्ती होय. संप्राप्तीची अवश्यकता मधुकोशांत फारच मार्मिक रीतीने सांगितली आहे. "असत्यांच संप्राप्ती व्याधश्चिकित्सोपयोगिनोंशाशं विकल्पना बलकालादेर प्रतीतश्चिकि साविशेिपो न स्यात" संप्राप्ति नाही म्हणजे रोगाचे चिकित्सेला उपयोगी पडणारे अंशांश कल्पना म्हणजें पोटभेद, बलावल, काल, इत्यादींचा निश्चय न होऊन नक्की उपचारांची योजना