पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२/५२/शास्त्र लो.टिळक ग्रंथसंग्र्हालय, वाई, जिल्हा सातार.
३१
राजयक्ष्मा-कफक्षय,



होणे अशक्य होते.यासाठी राजयक्ष्मा या विकाराची जी संप्राप्ति दिली आहे तिचाच विशेष विचार केला पाहिजे.
 कफप्रधानदोंषांनी रसवाही स्रोतसांचा अवरोध हे राजयक्ष्म्याचे आदिस्वरूप आहे . यामुळे उघड होत आहे की, कफामुळे ज्यावेळी रसस्रोतसे दूषित होतात त्यावेळी क्षय उत्पन्न होतो म्हणजें कफामुळे रसदृष्टि हें कफक्षयाचे कारण होते. परंतु ज्वरालाही कारण रसदुष्टिच आहे. ज्वराचे संप्राप्तीमध्ये ज्वरदास्यू रसानुगाः अजीर्णामुळे (अर्थात् कफामुळे) रसांतील दोष ज्वर उत्पन्न करितात असे असता राजयक्ष्म्यांतील रसदुष्टि कोणती ? तीमुळे क्षयच कां व्हावा; आणि ज्वर का न व्हावा ? याचे उत्तर असें आहे की, ज्वरांतील रसदुष्टिही आमाशयांतील अजीर्णामुळे झालेली असते. आणि त्यावेळी उरस्थानांतील रसविपाकाचे कार्य अबाधित असते. फुफ्फुसांमध्ये आधीच कफाची वृद्धि असत नाही. आणि पाचनादि क्रियांनी अजीणदोष नाहीसा झाला व ज्वर कमी झाला की रसविपाकाचे काम सुरळीत होऊन रसादिधातूंचे नीट पोषण होते. याचे उलट क्षयामध्ये आमाशयांत बिघाडाची शक्यता कमी. किंबहुना प्रथमतः तरी नसतेच म्हणणेहि चुकीचे नाही. हे या विकाराचे अश्नतोऽपि बलक्षयः । अन्न खात असूनहि शक्तिक्षीण होते या लक्षणावरून सहज सिद्ध होते. या क्षयविकारामध्ये रसाजीर्णामुळे रक्तादि धातूचे पोषण होत नाही ही गोष्ट खरी. मात्र हे रस जीर्ण आमाशयाचे विकृतीमुळे होत नाही तर उरस्थानाचे विकृतीमुळे होत असते. आणि उरस्थानांतच या विकाराला सुरवात होते. आमाशयांतून कसाहि रस तयार होऊन आला तथापि उरस्थानांत अशी एक विकृति उत्पन्न झालेली असते की, त्या रसावर पचनंसस्कार (यकृतांत) न होता तो कच्चाच राहतो. कफकारक पदार्थानी उदरस्थानांतील कफ वाढून असल्या चिकट बुळबुळीत पदार्थस्वरूपी कफाच्या ब-याच कालाच्या सहवासाने फुफ्फुरसाची नैसर्गिक शक्ति -हास पावते. त्यांचे ठिकाणी एक प्रकारचा फाजील ओलसरपणा येतो व त्यामुळे रसाचे योग्य पचन न होतां उलट त्यांत अपक पदार्थाची भरच पडते. ज्याप्रमाणे एकाद्या दलदलीच्या जागी पाणी टाकलें असतां तें न जिरतां अधिकच ओलसरपणा वाढविते त्याप्रमाणे स्थिति होते आणि मग जो अपक आणि चिकट स्वरूपाचा असला कफप्रधान रस रसवाहिनीत फिरतो. त्याने सूक्ष्म स्रोतसें बंद होऊन पुढील धातूंचे पोषणाभावी त्यांचा क्षय होतो.

रसोप्यस्य न रक्ताय मांसाय कुत एव तु।

या रेग्याचा रसधातु रक्त तयार करण्याला समर्थ होत नाही मग त्याने