पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
आयुर्वेदातील मूलतत्वे.


मांस कोठून व्हावे ? म्हणजे याला कारण उरस्थानांतील कफ व त्याचा रसधातूतील दूषणात्मक प्रसार होय आणि याप्रमाणे कफाची किंवा उरस्थानी श्लेषण कार्यकारी श्लेषणाची वाढ हेच क्षयाला मुख्य कारण असल्याने या जातीच्या विकाराला कफक्षय हे नांवच योग्य अर्थबोध करणारे आहे. या विकाराची चिकित्सा सांगतांनाहि कफालाच प्रधान मानून कफनाशक गुणाचेच उपायांची योजना अहे.

!“बलिनो बहुदोषस्य स्निग्धस्विन्नस्य शोधनं ।
उर्ध्वाधोयक्ष्मीणः कुर्यात् सस्नेहं यन्नं कर्शन"

शक्तिक्षीण झालेल्या उरस्थानांत तीक्ष्ण औषधांनी क्षत होऊं नये आणि क्षीण धातु अशा रोग्याची शक्ति फार क्षीण होऊ नये या धोरणाने पण वमनविरेचन हेच उपाय प्रथम यावर सांगितले आहेत. यावरून क्षयांतील कफाचे प्राधान्य उघड होत आहे. नाहीपेक्षां क्षीण स्थिती मध्ये बृहणच सांगितले असते. त्यांत लंघनाची योजना ( वमनविरेचन ) झाली नसती. वायूचा क्षय असल्यास बृहण सांगण्याची अत्यंत अवश्यकता व क्षयावर पौष्टिक योजना ठरलेलीच. आणि वायूचे शमनहें बृहणानेच होते.

‘बृंहणं शमनं त्वेव वायोः पित्तानिलस्य च '

तात्पर्य, वरील संप्राप्तीला अनुसरून होणारा हा क्षय कफामुळेच होणारा आहे. ही संप्राप्ति ध्यानी घेतल्यावर या विकारांत कोणते उपद्रव असावेत याचाहि खुलासा सहज होतो उरस्थानांतील कफाची वाढ ही आदिकारण असल्याने तेथील संचयाने प्रथम उरस्थानसंभाव्य श्वास व समीपवर्ति कंठास्थानावर होणाऱ्या परिणामाचा निदर्शक कास हे स्वाभाविकपणेच उत्पन्न होतात त्याचप्रमाणे प्रथम जिव्हा दूषित झाल्याने अरुचि होते. श्वास, कास हे विकार उरस्थानांतील कफसंचयाच्या प्रथमावस्थेत होतात. तोच अधिक काल राहिल्यास त्याचा प्रसार रसवाही स्रोतसांवर होऊन क्षय होतो म्हणूनच 'कासात संजायते क्षयः' खोकल्यापासून क्षय होतो असे सांगितले आहे. रसामध्ये कफदुष्टीमुळे रसाच्या अपकाक्स्थेत येणारा ज्वरहि या विकारांत स्वाभाविकपणेच असतो. अपक रसामुळे त्वचा, नेत्र इत्यादींवर फिकटपणा येतो. धातूंचे पोपणाचे अभावी शक्ति क्षीण होते. तथापि प्रथमावस्थेतच शरीर फारसे क्षीण दिसत नाही कारण आमरसामुळे बोजडपणा असतो. मुख्यत्वेकरून खोकला, मस्तक जड वाटणे, अरुचि, घसा भरून राहणे ही लक्षणं व धातूंचे पोषण बंद होणे म्हणजे क्षय समजावा. शीत आहारविहार, शीत हवा यामुळेच याचा विशेषतः प्रादुर्भाव होतो. व म्हणूनच हा कफक्षयच होय. मागे सांगितल्याप्रमाणेच पदार्थाच्या अनियंत्रित सामर्थ्यामुळे क्षयोत्पादक कफदुष्टी होते. चिकित्सा