पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
.राजयक्ष्मा-कफक्षय,


प्रसंगी सूक्ष्मपणे कारणपरंपरा पाहूं लागता कित्येक समयी काही रोगांमुळे आलेल्या क्षीणतेत क्षयाचे बीज रुजत असल्याचे दिसते. तरी पण या वेळीहि न सोसणारें शीतसेवनच कारण असते. अशक्तपणामुळे अशक्त झालेल्या फुफ्फुसांना शीतसेवन त्वरित बिघडवू शकते. कचित् असेंहि होण्याचा संभव असतो की, वाढलेल्या कफावर तीक्ष्णोष्ण उपचार करतांना शक्तिमानाच्या विचाराचे अभावी अतिमात्र उपचारांनी क्षत होऊन रक्त पडण्याचा संभव असतो. आणि त्यांत पित्ताचा समावेश होतो. एकादे वेळी क्षयामध्ये कफवृद्धीच असतांहि कफाचे पच्यमान अवस्थेमध्ये (कुजण्याच्या स्थितीत) एक प्रकारचा क्षार उत्पन्न होऊन (विदग्धः क्षारतां व्रजेत् ) त्यामुळेहि क्षत होऊन 'पित्तात् रक्तस्य चागमः' रक्त पडू लागणे (खोकल्यांतून) हा उपद्रव क्षयाचे लक्षणांत सामील होतो.अशा रीतीने कफाचे विदग्धावस्थेमध्ये प्रथमतः एका कफानेच उद्भवलेल्या क्षयाला पित्ताची मदत होते त्याचप्रमाणे घातूंचे पोषणाभावी होणारा जो धातुक्षय त्यामुळेही वायु दूषित होतो. (वायोधातुक्षयात् कोपः) आणि वायूची पार्श्वशूल इत्यादि लक्षणे या विकारांत मिळून क्षयाला त्रिदोपात्मक स्वरूप येते. व तो सर्वांगर्पूर्ण होतो. तथापि उत्पादक दोष कफच असल्याकारणाने आणि त्याचेच विकृतीने धातूंचाहि क्षय होत असल्यामुळे याला कफक्षय हेच नांव योग्य आहे. आणि यावरील उपचारहि कफप्राधान्याला अनुसरूनच असावयाचे. आनुवंशिक किंवा परंपरागत विकारांत याचा नंबर वर लागतो. मातापितरांना हा विकार असल्यास त्यांचे उरस्थान कफदूषित व कमताकद असतं. आणि अशा परिस्थितीमथे होणा-या संततीलाही उरस्थानाचा अशक्तपणा जन्मतःच असतो. थोडयाहि अपथ्याचरणाने त्यावर परिणाम होऊन विकार उद्भवतो. या विकारामध्येंही या उरस्थानांतील दुष्टीच मुख्य असते. बायुमुळे धातूंचा क्षय होतो. त्याला शोष हे नांव योग्य व तारतम्यभेदसूचक होऊ शकेल. व ग्रंथकारांनीही वायुप्राधान्य सांगत असतां शोष हाच शब्द योजला आहे. वायूचे प्राधान्यांत व कफाचे प्राधान्यांत स्पष्ट भेद असा आहे की, वायूमुळे एकेका धातूचा क्षय होतो. परंपरेनें तो सर्वात व्यापू शकेल. पण अनुक्रमाने उदा० अतिव्यायामुळे शुक्र क्षीण झाला तर तो क्षय या सदरांत येऊ शकेल. परंतु प्रथमतः त्या क्षयाची व्याप्ति शुक्रामध्येच मर्यादित असेल व प्रतिकाराचे अभावी, मज्जा, नंतर अस्थि अशा रीतीने व्यापक रूप येऊ लागेल व तेहि क्रमशः येईल. जखम वगैरेनी रक्तक्षय होईल. पण धातूंचे पोषणाचा मार्ग त्यांत अबाधित असतो. व त्यामुळे सुखसाध्यताहि असते. आणि कफक्षयांत सर्व धातूंचे पोषणच बंद होते. असा फरक या विकारांत उघड असतां दोहोंचाहि समावेश एकाच सद-