पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
आर्युवदाताले मूलतत्वे.



रात का केला हा एक प्रश्न राहतो. आणि धातूंचा क्षय हे सामान्य पर्यवसान दोहोंत एकच असल्याने एका प्रकरणांतच त्यांचा समावेश केला असावा असे वाटते. या विकाराचा त्रिदोष असा बहुतेक उल्लेख आहे. तो मागें सांगितल्याप्रमाणे त्यांत पित्त व वायु यांचा समावेश होतो म्हणून आहे. व तो प्रथम एक दोषी व नंतर त्यांत दोन व तीन या दोषांचा समावेश होतो असे सुचविणारे

'दोषैर्व्यस्तैर्भवेत् यक्ष्मा इति केचित् वदंति हि'

साचा:Right(सुश्रुत) व्यस्त दोषांनीही राजयक्ष्मा होतो. असे काही म्हणतात हे वाक्य आहे. आयुर्वेदांत कफक्षयाचें विस्तृत वर्णन असावें ( आजच्या काली) तसे नाही याचे कारण कदाचित् हा रोग प्राचीनकाळी फारसा फैलावला नव्हता की काय ? अशी शंका येते.

------
श्लेष्मा म्हणजे काय ?

मागील विवेचनावरून ध्यानात येईल की आयुर्वेदामध्ये ज्या श्लेषक शक्तीचे वर्णन केले आहे त्या शक्तीचे अधिष्ठानस्वरूप असा जो श्लेष्मा किंवा कफ हा सर्व शरीराचे लहान मोठ्या भागांत कमी अधिक प्रमाणाने असून त्यावर सर्व शक्तीचे अस्तित्व अवलंबून आहे. सृष्टीतील प्रत्येक पदार्थाची शक्ति किंवा इतिकर्तव्य ही काही तरी विशिष्ट मर्यादेत असते. मानवी शरीरही अर्थातच या नियमाला अपवाद नाहींच.बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या शरीराच्या अवस्थांकडे पाहिले असता सहज दिसून येते की पोषक पदार्थानी बाल्यावस्थेमध्ये शरीराची ठराविक मर्यादेंत वाढ होते, तारुण्यामध्ये त्याच पदार्थांचा उपयोग चालू असतांहि वाढ न होतां टिकून राहते; आणि वार्धक्यामध्ये कितीहि बृहणोपाय केले तरी क्षीणता यते. या तीनहि अवस्थांमध्ये बाल्यांत वाढण्यासाठी, तारुण्यांत राखण्यासाठी आणि वार्धक्यांत एकदम न्हास होऊ नये याकरता पोषणाची-पोषणोपायांची अवश्यकता आहेच, कोणत्याहि अवस्थेमध्ये शरीराचे घटकद्रव्यांमध्ये त्यांशी समान धर्मी अशा पदार्थाची भर घालणे जरूर असते. बाह्य सृष्टीतील पदार्थांमध्ये शरीरोपयोगी व त्यांशी समानधर्मी अशा पदार्थांचा-घटकांचा-सांठा आहे. परंतु हे पदार्थ शरीरघटकांशी भिन्नाकृति आहेत अर्थात् त्यांचा शरीराचे घटकांशी संयोग होऊन त्यातून स्वतःचे उपयोगी पडणारे द्रव्य काढून घेणे हे काम शरीरांतर्गत अशा निसर्ग सामर्थ्यालाच करावे लागते. विधात्याने योजनाच अशी केली आहे की, पदार्थ तोंडांत टाकल्यापासून शरीरांतील निसर्ग त्याला आपलासा करण्याचे उद्योगाला लागतो.