पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५
श्लेष्मा म्हणजे काय?

 अशा प्रकारचे सामर्थ्य का व कसे आहे या प्रश्नाचे उत्तर बरेच कठीण असून त्याची गरज आहेच असे नाही. वैद्यशास्त्र शरीराची दुरुस्ती करणारे आहे व म्हणून त्याला त्याचे स्वरूप कळले म्हणजे भागते. पोषण किंवा आहार्य पदार्थ शरीरांशी आत्मसात् होत असतां पहिले कार्य असें व्हावे लागते की, तो पदार्थ शरीरांरील धातूमध्ये मिसळावा लागतो. जर बाहेरचा पदार्थ काही काळ पावेतों शरीरघटकांशी संलग्न झाला नाही तर त्याला शरीरोपयोगी बनविण्याचे कार्य कसे होणार ? हेच पहिले कार्य आहे. आणि हे कार्य म्हणजे शरीरांतील पदार्थाशी समानधर्मी अशा पदार्थांचा संग्रह करणे होय. हा संग्रह जीमुळे होतो, ज्या शक्तीचे आकर्षतेने बाह्य पदार्थ स्थिरत्व पावून भर पडते ती ही श्लेषक्शक्ति म्हणजें कफ होय. या शक्तीचे कार्य आयुर्वेदीयांनी विसर्ग म्हणजे संग्रह किंवा पुरवठा करणे हे मानिले आहे. आणि ही शक्ति ज्या परमाणूंच्या किंवा सूक्ष्म अशा पिंडांच्या आश्रयाने शरीरांत वास करीत आहे. त्या पिंडांना किंवा परमाणूंना श्लेष्मा किंवा कफ असें नांव आहे. प्रस्तुत काळी संस्कृत भाषेच्या प्रचाराभावी हे शब्द जड किंवा दुर्बोध वाटण्याचा संभव करितां याला पूरक संयोजक-किंवा संघटना करणारे पिंड किंवा परमाणु या नावाने संबोधल्यास अडचण दिसत नाही. मागे एके ठिकाणी सांगितले आहे की, हे पिंड पृथ्वी आणि अप् या महाभूतदयाचे आधिक्याचे असतात. आणि त्यामुळेच यांत अशी आकर्षकता असते. हे पिंड शरीराच्या रचनाविशेषाला अनुसरून निरनिराळ्या भागांत कमी अधिक प्रमाणांत असतात. उर वगैरे जी मुख्य स्थाने त्यांत त्यांची संख्या अधिक असते या स्थानांचा उल्लेख मागे आलाच आहे. आयुर्वेदामध्ये स्निग्ध, शीत, इत्यादि जें कफाचे वर्णन आहे ते या पिंडांचे समुदायाचे होय. आयुर्वेदामध्ये प्रत्येक विकाराची मीमांसा या दोषांना अनुसरून केली आहे. पैकी कफाच्या विकारांमध्ये या पूरक पिंडांच्या न्यूनाधिक्याचाच विचार करावयाचा असतो.
 मागे दोन तीन विकारांची उदाहरणे दिली आहेत त्यांवरून हे ध्यांनी येईल. या घटकांची आहार्य पदार्थ वगैरे कारणांनी वाढ झाली असतां शरीरांतील पूरक किंवा संग्रह या कार्याची वाढ झालेली दृष्टोत्पत्तीस येते व अर्थातच शोषण कमी होते. आयुर्वेदामध्ये श्लेष्माः--

स्थिरत्वस्निग्धत्वसंधिबंधक्षमादिभिः॥

(देहं अनुगृहाति.) शरीराचे सर्व भागांत स्थिरता, स्निग्धता, सांधे दृढपणे चिकटून राहणे आणि मनाचे क्षमा वगैरे सौम्य धर्म या योगें कफ हा शरीरोपकारक आहे, असे सांगितले आहे. कफाचे स्वरूप हे अशा प्रकारचे आहे. शरीररूपी जो पार्थिवप्रधान असा पंचमहाभूतां