पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५

हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )

च्या संस्कृतीची निंदा करणे, हेच सुशिक्षितांचे लक्षण काही दिवस ठरावें ! आर्थिक दृष्टयाहि ही गोष्ट फायदेशीर होत असल्याने, आर्थिक उन्नतीवर श्रेष्ठत्वाचे मापन होऊन नव्य प्रिय सामान्य जनताहि थोड्या फार प्रमाणांत या विचार सरणीला बळी पडली. स्वाभिमान व आत्मविश्वास ह्या गुणांच्या अभावी आत्मनिंदा संभवते. पाश्चात्य वैद्यकाचा पगडा जनतेवर बसण्याला जी अनेक कारणे झाली त्यांत पुष्कळी कारणे अशी आहेत की ती केवळ दर्शनी थाट या वर्गात मोडतील. तयार व तिहि बीन त्रासाची औषधे हैं एक सामान्य जनतेला ओढण्याचे सहज साधन झाले.शस्त्र क्रियेची यशस्वी आश्चर्यकारक वाढ दिपविण्याला पुरेशी झाली. वाढते वाड्मय, वाढत्या सोयी, वाढती साधने, वाढता प्रसार आणि पाश्चयात्य वैद्यकाची मध्यस्थी करणाऱ्या वैद्यांचे-डाक्टर्सचे वाढते वैभव यामुळे गतानुगतिक जनतेच्या मनावर सहज परिणाम झाला की देशी वैद्यक खरोखरीच अपूर्ण असावें. आणि त्यामुळे आर्य वैद्यकाची निंदा करणाऱ्या स्वार्थी परदेशी व स्वाभिमानशून्य देशी प्रचारकांच्या सुराशी सामान्य जनतेचा सूर मिळून या चढेल सुरांत आयुर्वेदाचा अनादर व्यक्त झाला. आर्यवैद्यकाची प्रगती या पूर्वीच थांबलेली होती आणि अशा नवीन परिस्थितीत राजाश्रयाचा फायदा नाहीच पण राजाश्रयी पाश्चात्य वैद्यकासारख्या एका प्रबल प्रतिपक्षाचा मात्र फायदा झाला. आणि राहिला लोकाश्रय तोहि वरील विचारसरणीमुळे नष्ट झाला. मग आर्यवैद्यक कसे असेल, परकीय सत्तेखाली तेजोहीन झालेल्या लोकांची उपमा त्याला चांगली शोभेल. अशा रीतीने आयुर्वेदावर जो परिणाम झाला त्यामुळे अर्थातच तो मागे पडला. परंतु थोड्या कालाने ही स्थिति पालटून आयुर्वेदाविषयी विचार करण्याची प्रवृत्ति थोडीशी सुरू झाली. काही अगदी थोड्या डॉक्टरांना आयुर्वेदाकडे उडतीनजर तरी टाकावीशी वाढू लागली. बाकी आयुर्वेदाचा अगदी विचार न करता किंवा आयुर्वेद म्हणजे काय आहे याचीहि जाणीव नसतां अगदी थोडे अपवाद खेरीज करून एकजात सर्व डॉक्टर आयुवेदशास्त्र शुद्ध नाही असे प्रतिपादन करण्यास मात्र चुकत नसत. परधर्माची दीक्षा घेणारा त्या नव्या धर्माची थोरवी वर्णन करूनच न थांबतां पूर्वीच्या स्वधर्माची टवाळी करून कृतकृत्यता मानतो.