पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
आयुर्वेदातील मूलतत्वे.



होऊन एकत्रित झालेल्या परमाणुगणांतच पचनाचे कार्य सुरू होते. अन्नाच्या पचनाला आमाशयांत सुरवात होण्यापूर्वी आमाशयाश्रयी अशा क्लेदक कफाची त्यावर क्रिया होऊन सर्व घनद्रव अशा स्वरूपाचे आहाराचे पातळ स्वरूपामध्ये मिश्रण होते असे कफाच्या विवेचनांत आलेच आहे. व असा पातळपणा आल्यावर (अन्न-संघातक्लेदनात-क्लेदक अन्नाचें क्लेदन करणारा म्हणून त्याला क्लेदक असें नांव आहे.) पित्ताच्या क्रियेला सुरवात होते. यासाठी पित्ताचे वर्णन उष्णता विशिष्ट किंवा उष्णतमय अशा पातळ पदार्थाचे वर्णन आहे असे सहजच ठरतें. तात्त्विक दृष्टीने जरि उष्णता किंवा तेज हे तत्त्व प्रवाहीस्वरूपाचें नाहीं तरी शरिरांत जे त्याचे कार्य दृष्टोत्पत्तीला येते ते केवळ तत्वात्मक नसून त्याच्या कमी अधिकपणावर ज्या शरीर-क्रियांची सारथ्य अथवा विकृति अवलंबून आहे त्याचे स्वरूप स्पष्ट दाखविण्यासाठी त्या पदा र्थाचेच स्वरूप वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे श्लेष्मा हे तत्त्व अपविशिष्ट आहे तथापि शरीरातील श्लेषण कार्य हे केवळ अप् या तत्त्वाचे वास्तविक स्वरूपाने होणारे नाही, तर त्याच्या पार्थिव परमाणूंच्या विवक्षित मिश्रणामध्ये ही शक्ति उपयोगांत येते. त्याचप्रमाणे पित्त म्हणजे तत्त्वतः उष्णता असली तरि तिचा शरिराला जो उपयोग होतो, तोहि जलतत्व आणि काही अल्प प्रमाणांत पार्थिव परमाणूंचाहि त्यात समावेश होतो, पंचमहाभूतें ही पृथग्भावाने उपलब्ध होणारी नसून परस्पर संघटित असेंच त्याचे स्वरूप उपलब्ध होणार आहे. हा आशय ध्यानी घेतला असतां पित्ताचे आयुर्वेदीय वर्णन यथार्थ असल्याचे प्रत्ययाला येईल. वर वर्णन केलेले पित्ताचे गुण ज्यांत पुष्कळ प्रमाणांत दृष्टोत्पत्तीला येतात असा पदार्थ पाहूं लागल्यास बहुतेक अम्लवर्गातील पदार्थांमध्ये हे गुण संभवतात. आंबट पदार्थ हे स्वभावतः पाचक असल्याचे न सांगतां कळणारे आहे. यांमध्ये अपतत्वाचा पातळपणा असतोच. पातळपदार्थ अधोभागी म्हणजे खाली वाहणारा हे अर्थात् उघड आहे. इतर पातळ पदार्थांपेक्षां यांत उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने ज्या पार्थिव घटकांवर पदार्थाचे वजन अवलंबून असते, त्यांची यांत न्यूनता असते म्हणून ते वजनाला हलके असते व त्यामुळे त्यांत स्निग्धतेचा गुणही अल्प राहतो. आम्लपदार्थाचा आंबुसपणा तर सहजच आहे. अशा रीतीने पित्ताचे वरील वर्णन अगदी यथार्थ आहे.

___________
पचनाची अवश्यकता.

  शरिराचे पोषणक्रियेला आमाश्यापासून सुरवात होते, आणि जसजसे एकाहून एक शुद्ध स्वरूपाचे धातु बनत जातात त्या मानाने पच-