पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९
पित्ताची मुख्य स्थानें,

 नाचे कार्य सूक्ष्म स्वरूपाचें होते. अन्न, रस, धातु वगैरे मध्यें किट्ट भागाचे प्रमाण अधिक असतें व त्याचें पृथक्करण करणारी पचनशक्तिहि अधिक प्रमाणांत असते. अगदी लहानांत लहान असा जरि शरिराचा सजीव परमाणु घेतला तर त्यामध्ये त्याप्रमाणे श्लेषण व नंतर पाचन किंवा शोषण हे असतें. झिजलेल्या भागाची उणीव भरून काढणारा घटक त्याशी संलग्न करण्याचे कार्य श्लेषक तत्वाने म्हणजे श्लेष्म्याचें झालें कीं लगेच तो घटक मूळ घटकामध्ये एकजीव कर ण्याचे काम अर्थात् पित्ताची क्रिया सुरू झालीच. झिजून निरुपयोगी झालेला भाग मलरूपाने बाहेर निघून जातच असतो. शरिराचा जिवंतपणा म्हणजेच ही क्रियात्मकता होय. आणि सतत सर्व शरिरामध्ये झिजलेला, निरुपयोगी झालेला भाग निघून जाणे; त्यामुळे कमी झालेल्याची भर पडणे आणि ती आत्मसात् करून घेणे याच व्यापाराला जिवंतपणा म्हणावयाचें. अशा रीतीनें सर्व शरिरामध्ये पित्ताचें पाचन कार्य होत असतें, म्हणून या शक्तीला आयुर्वेदाने व्यापी हैं विशेषण दिले आहे. तथापि अधिक प्रमाणामध्ये पित्ताचें कार्य ज्या ठिकाणी होतें. आणि तसे होणें शरीरव्यापाराला अवश्य आहे तेथे पित्ताचे वास्तव्य अधिक प्रमाणांत असतें हाणून तीं त्याची मुख्य स्थान गणली आहेत. ती स्थानें हीं:--

-----
पित्ताचीं मुख्य स्थानें.
नाभिरामाशयः स्वेदो लसिका रुधिर रसः ।
दृक् स्पर्शनं च पित्तस्य नामिरत्र विशेषतः ॥ १॥


(अ. हृ. सू. अ. १२ श्लो. २ )

 नाभि (ग्रहणीकला ), आमाशय, घाम, लस (शरिरांतील पाण्यासारखा एक पदार्थ ) रक्त, डोळे, स्पर्शनेंद्रिय (त्वचा) हीं पित्ताचीं मुख्य स्थानें होत. यांतही विशेषतः नाभि हें मुख्य आहे.
 या स्थानामध्ये पित्ताचें आधिक्य का आणि कसें आहे. त्याचप्रमाणे त्यामुळे शरिरोपयोगी अशा कोणत्या क्रिया घडून येतात याचा विचार करूं. या पित्ताच्या मुख्य स्थानाविषयीं कांहीं मतभेद ग्रंथांतरी दिसतात. नाभि आणि आमाशय हीं पित्ताची स्थाने म्हणजे काय ? या विषयींचा ऊहापोह थोडा संशयितच आहे. तथापि नाभि या स्थानाचा उल्लेख केला आहे. तो ग्रहणीला अनुलक्षून असावा असेच अनुमान करणे चुकीचे होणार नाहीं, कारण 'पक्वामाशयमध्यगम् ' पक्वाशय आणि आमाशय यांचमध्यें असें हें स्थान असल्याविषयी एकवाक्यता आहे. आणि हें स्थान म्हणजे ग्रहणीकला होय. हें तिच्या