पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
आयुर्वेदांतलि मूलतत्वे.



भुक्तमार्मार्गालेक्सा ॥ भुक्तमामाशयेरुध्वा साविपाच्य नयत्यधः
ग्रहणी ही आम आणि पक्वाशय यांमधील अडसरच होय योग्य वेळपर्यंत आहार आमाशयांत राखून ठेवून त्यावर पाचन संस्कार झाल्यावर पक्वाशयांत जाणे या गोष्टीमुळे तिला ग्रहणी असें नांव आहे, हे या वर्णनावरून उघड होते. षड्रसयुक्त अशा चतुर्विध आहाराचे आमाशयांतील क्लेदक कफाने पातळ स्वरूपाचे मिश्रण झाल्यावर

आदौ षडरसमप्यानं मधुरीभूतमीरयेत् ।।
फेनीभूतं-कफं--याचप्रामणे
अन्नं कालभ्यवहृतं काष्ठं प्राणानिलाहृतं ॥
द्रवैर्विभिन्न संघातं नीतं स्नंहेन मार्दवम् ।। अ. ह. सा. अ 2

त्यांत पाचक पित्ताचे मिश्रण व्हावे लागते. प्रवाही असे मिश्रण बनल्यावर पातळपणामुळे त्यांत जाण्याची त्याची प्रवृत्ति स्वाभाविकच असते. आणि खाली पक्वाशयांत जात असतां पित्ताने पचन झालेला भाग खाली जाणे हे एक अवश्य कार्य आहे. आणि ते पक्वाशय आणि आमाशय ह्यांच्या मध्यावरच व्हावे लागते, नाहीपेक्षां सर्व आम अन्न तसेंच खाली पडून जाईल. ज्यावेळी या ठिकाणी पित्ताचा कमी. पणा होतो त्यावेळीच पचन न झाल्याकारणाने आमच गुदमार्गाने पडतो आणि आमाचे विकार होतात. अबलात्वन्नमामंभव विमुंचति (ग्रहणी ) अबल झाली असतां आमास्थितीतच अन्नाला खाली जाऊं देते. (अशा रीतिने या ठिकाणी पित्ताची अवश्यकता आहे. या पित्ताचे वर्णन करीत असतां 'त्यक्तद्रवत्वं पाकादि कर्मणाऽनलशब्दितम्' पातळपणा नाही असें व त्याच्या पचन कार्यावरून जठराग्नि असें नांव दिले आहे असा उल्लेख आहे. आणि पित्त तर 'द्रवम् ' म्हणजे पातळ असल्याचे वर्णन आरंभी दिले आहे. तरी यांचा उद्देश काय ? असा एक प्रश्न सहज उद्भवतो. आरंभी सांगितलेच आहे की, तात्विक दृष्ट्य पित्त हे पातळ नाही. तथापि शरिरांत ते तशा स्वरूपाच्या पदार्थंत उपलब्ध होते. हे जे आमपक्वाशय यांचे मध्यवर्ति पाचक पित्त सांगण्यांत आले असून त्याचे वर्णन 'त्यक्त द्रवत्वं' असे केले आहे याचा उद्देश असा कीः-वास्तविक अन्नाचे आमाशयांत होणारे द्रवमिश्रण कफाचे कार्य आहे, स्थानाश्रयी अशी उष्णताच त्या द्रवस्वरूप अन्नाचे पाचन करते, सर्वत्र जरी पित्ताचे कार्य याच तत्वावर होते तरी आमाशयांत द्रवांश वाढणे पचनाला विघातक आहे. द्रवादि पित्त असू शकते या समजुतीने द्रवांशाची उपेक्षा होऊ नये, या चिकित्साविषयक दूरदशीपणाकरतांच पित्ताचा 'त्यक्तद्रवत्व, असा उल्लेख केला असावा.

यन्नं देहधात्वोजो बलवर्णादिपोषणं॥