पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
४१
पित्ताची मुख्य स्थाने,


तत्राग्निहेतुराहारान्न ह्यपक्काद्रसादयः ॥१॥

  शरिरांतील सप्तधातु ओजशक्ति, वर्ण इत्यादिकांचे पोषण करणारे अन्न आहे तथापि त्याला अग्नीची अत्यंत अवश्यकता आहे. अपक आहारापासून रसादींची उत्पत्ति होत नाही. याच पित्तामुळे शरिरातील सर्व ठिकाणी पाचक तत्वाचा पुरवठा होतो, म्हणजे ज्या रसाने सर्व शरिरामध्ये पोषण व्हावयाचे त्या रसाचे द्वारेंच पित्ताचाहि सर्व शरीरभर योग्य प्रमाणांत पित्ताचाही प्रसार होतो, याला पाचक-पित्त असें नांव दिले आहे. पित्त म्हणजे पाचक असे असतांहि मुख्य पचनाचे काम ज्या ठिकाणी होते तेथील पित्ताचा विशिष्ट शब्दाने शास्त्रीयव्यवहाराचे सोयीसाठी पाचक या नांवाने निर्देश केला आहे, पाचकपित्ताची विकृति असा उल्लेख केला म्हणजे जाठर विकृति ध्यानांत यावी हा त्याचा उद्देश आहे. दुसरे पित्तस्थान आमाशय होय, याचे कार्य अन्नरसाचे रक्त बनविणे हे आहे.

आमाशयाश्रयं पित्तं रंजक रसरंजनात् ॥

  आमाशयाचा (आश्रय करून राहणारे पित रसाला रंगवून त्याचे रक्त बनवितें म्हणून त्याला रंजक या नावाने ओळखले जाते, ) या रंजक पित्ताविषयीही ग्रंथांतरांत मतभेद आहे. वरील वाक्य अष्टांगहृदयांतील आहे, आणि त्यावरून या पित्ताचे स्थान आमाशय. रसावर रंजन संस्कार आमाशयांत होतो, असा बोध होतो. परंतु हे रसरंजनाचे कार्य वास्तविक आमाशयांत होत नाही. आमाशयांत अन्नरसहि पूर्णपणे तयार होत नाही हे मागील पाचकपित्ताचे वर्णनांत आले आहे. आमाशय हा एक अन्नाचा साठा असून तेथें पचनाचे पूर्वकार्य म्हणजे अन्नाचे पातळ मिश्रण होते व नाभिस्थान किंवा ग्रहणीच्या मदतीने त्याचे सारभूत रस व मळ असें पृथकरण होते. असे असतां आशय हे रंजक पित्ताचे स्थान कसे ? अशी एक शंका अगदी साहजिक रीत्याच उत्पन्न होते. सुश्रुतामध्ये रंजक पित्ताचे स्थान यकृत् प्लीहाच सांगण्यांत आले आहे. आणि एकंदर विचार करतां आमाशय हे स्थान रंजक पित्ताचे ठरत नाही. त्या अष्टांग हृदयामध्ये

'व्यानेव हसधातुर्हि विक्षेपोचितकर्मणा।
युगपत्सर्वतोऽअस्रं देहे विक्षिपति सदा ॥१॥

(हृदयाश्रयी अशा व्यान वायूकडून सर्व शरिरांत रस धातु फेंकला जातो.) असा उल्लेख आहे. अन्नाशयामध्ये सार आणि किट्ट असें वर्गीकरण झाल्यावर तो सारस्वरूपी रस यकृतांत येतो. आणि तेथे असलेले पित्ताचे मिश्रणाचे कार्य त्यावर होऊन त्या रसामध्ये योग्य इतका पातळपणा, खच्छता आणि उष्णता, ही उत्पन्न व्हावी