पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३
पित्ताची मुख्य स्थाने,



रसाला रक्तत्व आणणे हे कार्य यकृतांतील पित्ताचेच असते. आणि हे पित्तहि ज्याचा आंतड्यांत स्राव होतो ते नाही. त्याशिवाय यकृताचे मध्यभागी स्रोतसांतून भरून राहणारे हे रंजक पित्त वेगळेच आहे. व त्यालाच अनुसरून हे वर्णन आहे. रंजक पित्ताचे स्थान यकृत् हें निश्चित आणि म्हणून,

आमाशयाश्रयं पित्तं रंजकं रसरंजनात् ।

  यांतील आमाशय याचा अर्थ आमरसाचा आशय-यकृत्-असाच स्वीकारला पाहिजे.

 पित्ताचे तिसरे मुख्य स्थान रक्त आहे. रक्तामधे सर्व धातूंचे पोषणासाठी त्या त्या धातूंमध्ये प्रवेश होण्यासारखा पातळपणा असावा लागतो. हा पातळपणा अर्थात् त्यांतील उष्णतेमुळेच राहत असतो. व तो ज्या प्रमाणांत कमी होईल त्यामानाने रक्ताला घन स्वरूप येऊन सर्व शरिरामध्ये त्याचा सुखाने संचार होत नाही. रक्ताचा शरिराला जो उपयोग होतो. तो या पित्तावरच अवलंबून आहे. पित्ताची आणखीं सांगितलेली स्थाने:--स्वेद व लसिका ही दोन पित्ताची स्थाने रक्ताश्रयी आहेत. रक्त पचनांतच हे दोन पदार्थ उत्पन्न होणारे आहेत. व ऊष्ण रक्तांतून जे हे दोन पदार्थ तयार होतात त्यांमध्ये रक्तातील उष्णताहि येत असते. त्याचप्रमाणे त्वचा हे स्थानहि रक्ताचेच निदर्शक आहे. कारण त्वचेतील उष्णता म्हणजे रक्तातील उष्णताच असते. अशा रितीने ही तीन पित्तस्थाने म्हणजे तत्वतः रक्ताची उष्णता दाखविणारोंच होत. यावरून उष्णता प्रतीत होते. व त्यांत राहू शकते. यामुळे त्यांचा पित्तस्थानत्याने निर्देश केला आहे.
 पित्ताचे आणखी स्थान रसधातु आहे. या स्थानाचे बाबतीतही सूक्ष्म विचार करतां दिसून येईल की, रसाला पित्तस्थान म्हणण्यांत फारसें तात्विक महत्व नाही. कारण पित्त जें रसांत असते ते ' रंजकपित्त,' होय. अन्नरसांत रंजकपित्त मिळून त्याला लाली आली म्हणजे तो रस धातु होतो. या रंजक पित्ताचे मिश्रणानेच त्याचे 'आप्य,' [ सखलु आप्योरसः यकृत्प्लीहानी प्राप्य रागपाकावु पैति ] [ सुश्रुत. ] स्वरूप जाऊन त्यांत उष्णता आणि लाली येते. ही उष्णता रसांत असते, एवढ्यावरूनच त्याला पित्तस्थान म्हटलें आहे. वस्तविक पित्ताचे कार्य असें रसांत होत नाही, कार्य रंजक पित्ताचें होते व ह्मणूनच कफाचेहि स्थान रसधातु सांगितले आहे. हृदय हे पित्ताचे स्थान आहे. हृदयांत आलेल्या रसधातुला ठरावीक उष्णता राखण्यासाठी या स्थानांत असावी लागते. हृदयस्थानी जी संकोच विकासात्मक गति असते तीमुळे अभिसरणाला योग्य असा पातळपणा राहतो. हृदयांत उष्णता असते. तरी ती एवढेच कार्य करिते. येथे पचनाचे काम नाही. पित्ताचे