पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
आयुर्वेदांतील मूलतत्वे.



आणखी एक महत्वाचे स्थान हणजे नयनेंद्रिय होय. या स्थानांतील उष्णता मात्र फक्त तेज या शुद्ध स्वरूपाची असते. हिचे वास्तव्य कसें असते. आणि स्वरूप काय ? याचे उत्तर ती नेत्रांतील कनीनिकेचा आश्रय करून राहते. आणि रूपालोचन करते. याहून नाही. तो स्वभाव आहे. अशा रितीने प्रामुख्याने पित्ताची स्थाने हणजे ग्रहणी किंवा पित्ताशय, यकृत् (प्लीहादि यांमध्ये येते.) घाम, लसिका, रक्त, रस, दृष्टि आणि त्वचा ही आठ आहेत. या आठ स्थानांमध्ये ग्रहणी, यकृत्, (व प्लीहा ) यांतील पित्ताचे कार्यकारी सामर्थ्य फार महत्वाचे आणि त्यांमध्यहि पित्ताचे अधिकांत अधिक गुण यकृतामध्ये असून पूर्वोक्त पित्ताचे वर्णनहि येथेच चांगल्या रीतीने पहावयास मिळेल. येथील पित्त है--

पित्तं सस्नेहतीक्ष्णोष्णं लघु विस्त्रं सरं द्रवम् ॥

 या सर्व गुणांचे आहे. दृष्टी हे पित्तस्थानहि एक उत्कृष्ट कार्यकारी आहे. त्याचे अभावी सर्व जग आंधळे.

दृष्टिश्चन्ष्टा विविधं जगश्च तमोमयं जायत एकरूपम् ।

  डोळे गेले मग अनंतस्वरूपाचे जगाला फक्त एकटेंच अंधकारस्वरूप येते. तथापि पित्तगुणाचा तेथें निवास व्यक्त प्रमाणांत आहे. हृदयाश्रयी पित्तालाहि एका मुख्य गुणाचे कर्तृत्व आहे. हा गुण ह्मणजे सर्वबुद्धिजन्य कायें करविणें हा होय. आर्य वैद्यकामध्ये हृदय हे बुद्धीचे, मनाचे, चेतनेचे,मुख्य स्थान मानले आहे. व त्याला याच दृष्टीने अत्यंत महत्व आहे.

हृदयं चेतनास्थानमुक्तं सुश्रुत देहिनाम् ।

  व हे कार्य त्यांतील पित्तांचे उष्णता या गुणामुळे अव्याहतपणे घडते. आणि यासाठी पित्ताचे कार्यकारी ठिकाणांत तें एक आहे. मनाचे स्थान मेंदू मस्तिष्कपिंड मानण्यात येऊन त्याबरोबर हृदय हे प्राणायतन मानणा-या आयुर्वेदाला अतत्वज्ञ मानण्याचा कल दिसून येतो, सर्व ज्ञानतंतूंचा उगम मस्तिष्कापासून झालेला प्रत्यक्ष असल्याने हे म्हणणे खरेंहि भासते, तरि पण जर या ज्ञानतंतूंना ऊत्तेजित कोण करतें ? असा प्रश्न केला तर, हृदय हेच उत्तर मिळेल. विधात्याने हृदयप्रदेशच संकोचविकासात्मक ठेवला आहे, आणि सर्वत्र गति येथूनच मिळते. शरिराचे प्रत्येक लहानहि घटकाला श्वासाचे वेळी विकास व उच्छवासाचे वेळी संकोच याच स्थानांतून मिळतात, व म्हणून ज्ञानतंतूंचे उगमस्थान जरि मस्तिष्कापिंड असलें तथापि त्या उगमस्थानीहि चेतना पुरविण्याचे काम हृदय करते, व या चेतनेचे प्रेरणेचे अथवा उत्तेजनचे-जोरावर मग ज्ञानतंतु कार्य करतात, आणि ह्मणून हृदयच चेतनास्थान मानणे सयुक्तिक आहे. त्वचा किंवा स्पर्शनें