पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
पित्ताची मुख्य स्थाने,



द्रिय या पित्तस्थानामध्ये उष्णता कार्यकारीच आहे. हे कार्य त्वचेवरील तेजस्विता राखणे. मात्र हेहि रक्ताश्रयी उष्णतेचेंच कार्य मागे सांगितले आहे. ह्मणजे मुख्य कार्यकारी पित्ताची स्थाने, ग्रहणी यकृत् त्यांहून कमी दृष्टी, हृदय आणि त्वचा ही व रस, लसिका, स्वेद ही निवासस्थाने होत. प्रत्येक शरीराचे भागामध्ये लहान घटकामध्ये हि पित्त आहे आणि नवीन पोषक आत्मसात् करणे, त्यांतील सार, मलभाग वेगळा करणे ही कामें चालतच असतात, आणि यालाच अनुसरून, जाठर अग्नीबरोबर धात्वग्नीहि सांगितले आहेतच सर्व धातूंच्या मानाने रक्तात हे कार्य अधिक प्रमाणात होते, कारण त्या धातूंत स्थूलता अर्थात् मल जास्त म्हणून येथें पित्ताचे कार्य जें पचन सारकिट्ट विवेचन तें बऱ्याच प्रमाणांत झालेले दिसत असतां कार्यकारीस्थानांपैकी रक्त का मानू नये असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु धात्वग्नीची व्याख्या मानल्यवर त्यांत अधिक कार्यकारी रक्तस्थ धात्वाग्नि असे मानणे, व अर्थात् पित्ताची जी धातूशिवाय इतर मुख्य स्थाने त्यांत या स्थानाचा समावेश न करणे परिभाषेच्या दृष्टीने सयुक्तिक आहे. दुसरी आणखी अशी शंका येण्याचा संभव आहे की, पित्ताचे सर्व गुण जर यकृतामध्ये स्पष्टप्रत्यय आहेत तर मग स्थाननिर्देशाच्या वेळी ग्रहणीचा अग्रयत्वाने निर्देश का केला ? (नाभिरत्र विशेषतः) ज्याप्रमाणे उरस्थानीय कफामध्ये सर्व गुण अधिक प्रमाणांत असल्याने कफस्थानामध्ये (सुतरामुरः) पान उरस्थानाचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे पित्तस्थानांमध्ये यकृताचा उल्लेखच करावयास पाहिजे होता. परंतु तो तर तसा केला नाही, आणि 'नाभिरत्र विशेषतः' या वाक्याने पित्ताचे मुख्य स्थान नाभि अथवा ग्रहणी सांगितले आहे. या ठिकाणचे पित्ताचे वर्णन करतांना मात्र

त्यक्तद्रवत्वं पाकादि कर्मणाऽनलशब्दितम्


ज्या ठिकाणी पित्ताचे द्रवत्व अर्थात्-द्रवत्वावलंबी इतरहि, विस्रसर इत्यादि गुण नाहीत असे आणि केवळ पचनाने कार्यावरून अनुमेय असे याचे वर्णन केले आहे. याचे कारण काय ! वास्तविक पाहतां पित्ताचे गुण सर्वतः येथे नाहीत हे जरि खरे आहे तथापि पित्ताचे जे पाचनकार्य तें या ठिकाणी होते. येथील सुव्यवस्थित्त आहारपचनावरच सर्व शारीरिक पोपण अवलंबून आहे.

अन्नस्थ पक्ता सर्वेषां पत्तृणां अधिको मतः।
तन्मूलास्ते हि तदवृद्धिक्षयवृद्धिभयात्मका: ॥


सर्व अग्नीमध्ये अन्नाचे पचन करणारा जठराग्नि ह्मणजे पाचक पित्तच श्रेष्ठ होय.