पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
आयुर्वेदांतील मूलतत्वे.



(अन्नस्य पक्ता पित्तं तु पाचकाख्यं पुरेरितम्)


कारण त्यावर सर्व आग्नित्यांची वाढ व -हास अवलंबून आहेत व म्हणूनच पित्ताचे स्थान मुख्यत्वे नाभि सांगितले आहे. मात्र ही उपपत्ति मानताना श्लेष्मस्थानाचे दृष्टीनेहि असे म्हणता येईल की, आमाशय हे कफाचे याचप्रमाणे स्थान आहे. जसे, उष्णताविरहित कार्य पित्ताचे, नाभि ठिकाणी होते, त्याचप्रमाणे शीत किंवा अविशिष्ट कार्य कफाचे आमाशयांत होते. तेथे जर कफाची अर्थात् जलांशाची न्यूनता झाली तर सर्व शरिरामध्येहि होईल. जर आमाशयांत कफाचें 'अन्नसंघात क्लेदन' अन्नांत पातळपणा उत्पन्न करणे हे कार्य नीट झाले नाही. तर पचनहि नीट होणार नाही आणि या उद्देशाने पाचकाग्निइतकेंच क्लेदक कफालाहि महत्त्व असतां कफाचे स्निग्धशीतादि सर्व गुण ज्या ठिकाणी आधिक्यांत प्रतीत होतात, असें उरस्थान प्रामुख्याने सांगण्यांत आले आहे व (पुढील ) वायूचेहि प्रकरणांत, अन्नप्रवेश त्याचप्रमाणे श्वासोच्छ्वासादि महत्वाच्या क्रिया करणाऱ्या प्राण व व्यान या वायूंना शरिरामध्ये इतके महत्व की, ज्यावर प्राण राहणे अवलंबून, अशा प्राणाचे स्थान मुख्य न सांगतां वायूचे, सूक्ष्म-लघु इत्यादि गुण प्रतीत होणारा पक्वाशय मुख्य सांगितला आहे. त्याचप्रमाणे पित्ताचेहि मुख्य स्थान यकृतच सांगावयास पाहिजे होते. ही सहजच पटणारी कल्पना असतां पाचक पित्ताचे ग्रहणीस्थान मुख्यत्वे पित्तस्थान मानणान्या आयुर्वेदीयांची ही भूल काय ? नाही? याचे कारण असे की हे स्थान सांगून चिकित्सेमध्ये एक महत्वाची सूचना दिली आहे' चिकित्सेमध्ये शोधनाला फार महत्त्व आहे. आणि पित्तावर शोधन जें विरेचन त्याचे कार्य या स्थानावर घडणारे आहे. शिवाय दूषयंति इति दोषाः ही व्युत्पत्ति ध्यानी घेतली म्हणजे अविकृत स्थितीतोल पित्तापेक्षां विकृतावस्था जेथें प्रतीत होते, अशा ठिकाणाचा उल्लेख करणे चिकित्साशास्त्राला महत्वाचे वाटावें यांत नवल नाही. या दृष्टीने अविकृत पित्ताचा विचार चिकित्सेला पाहिजे. तो त्याची विकृति समजण्यासाठी यांत विकारावस्थेत मुख्यत्वे अधिक पित्त कोठे व अधिक त्रास कोठें देते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणचा आद्यसंचय इतर स्थानांत पित्ताची वाढ करतो व ज्यावर शोधनाचा उपयोग प्रथम होऊन इतर स्थानांतील दोषाच्या प्रसाराला आळा बसतो. अशा स्थानांचा सर्वांपूर्वी आणि महत्वाचा ह्मणून उल्लेख करणे युक्तिग्राह्य वाटेल. पित्ताचे विकृतीला सुरवात या नाभिस्थानांत होते. येथूनच यकृत् वगैरेत त्याचा पुरवठा होतो व शोधन में विरेचन त्याने हेच स्थान दोषरहित करून इतर पित्तस्थाने सुरक्षित राखावयाची असतात, शिवाय ज्या वेळी शोधनाह पित्तविकृति होते, त्यावेळी या पित्ताचे