पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
पित्ताची मुख्य स्थानें,



' त्यक्तद्रवत्वं' इत्यादि स्वरूप टिकत नाहीं तर या स्थानांतील पचनाचे कार्य कमी होऊन आहारांतील पदार्थ योग्य वेळीं आणि योग्य रीतीनें न पचतां त्यावेळी ते आंबतात व या विदग्ध स्थितीत हैं पित्त वाढते त्यावेळीच ते शोधनार्ह असते केवळ पित्त-उष्णता वाढेल तर त्याला अत्यग्नीचें स्वरूप येऊन पचन लवकर होते व या अवस्थेमध्ये इतर पित्तस्थानांतहि तादृश विकृतीचा संभव कमी, या अवस्थेत विरेचन नाहीं, व विकारहि फारसे नाहींत, आरंभाला पित्ताचें केवळ उष्णता हें स्वरूप नसून, तें प्रवाही आम्ल, असें सांगण्याचा हेतुहि हाच आहे कीं, हें वर्णन दोषांचें अर्थात् विकृती उत्पन्न करण्याचे स्थितीतलें, केवळ उष्णता कार्यकारी खरी, पण विकारकारी त्यावेळीं कीं, जेव्हां विस्त्रादि गुण तींत सामील होतात, आणि त्याच स्थितीला दोष म्हणावयाचे, हा उद्देश ध्यानी घेतला म्हणजे, ज्या आंतड्यांतील विदग्धावस्थेमध्ये हे पित्ताचे गुण वाढून विकारकारी होतात, ती अवस्थाच दोषाचे दृष्टीने अधिक महत्वाची आहे. चिकित्सा यावर आधी आणि शोधनाचे कार्यहि त्याच अवस्थेत होतें, म्हणून इतर स्थानांचा उल्लेख मुख्य म्हणून न देतां सदोष स्थितीत हेंच स्थान पहिलें सांगितलें आहे. अशा रितीनें विचार केल्यास विसंगति न दिसतां पूर्वीचें पित्ताचें लक्षण व हें स्थान यांची संगति लागते, व आयुर्वेदीय विवेचनाचे धोरणहि ध्यानी येईल. दोषांचे आयुर्वेदीय वर्णन केवळ शक्ति किंवा गुण या स्वरूपाचे नसून गुणाश्रयी पदार्थ असें आहे, याचा यावरून खासा उलगडा होईल, चिकित्सेचे रहस्य ध्यानांत येण्याला ही गोष्ट विसरून भागणार नाहीं, दोषांना दोष हैं नांव देऊनच ज्या अवस्थेत बिघडविण्याचें असें त्याचे स्वरूप होतें, तीच अवस्था दोष नांवानें वर्णिलेली आहे, त्यापूर्वीची अविकृत स्थिति तत्वतः धातु नांवाने संबोधणे किंवा शक्ति अगर निसर्ग कांहीं म्हणून चालेल, मात्र दोष हे नांव दिल्यावरहि शक्ति आहेत म्हणणे सयुक्तिक नाहीं, शक्ति अम्ल, शक्ति पातळ घाणेरी, स्निग्ध वजनदार बुळबुळीत असलेली कशी असेल ? ती असल्या पदार्थात असते, व यांची विकृति घडवून याच स्वरूपांत रोगोत्पादक होते, प्रत्येक ठिकाणी जर हे त्याचे स्वरूप ध्यानीं घेऊन शक्तीचे कार्य आणि शक्तिमान् पदार्थदोषांची विकृति नीट विचारांत घेतली, तर आयुर्वेदांत सूत्रमय कां होईना पण अविकृत आणि विकृत या दोन अवस्थांतील इंद्रियविज्ञान किती उत्कृष्ट आहे याचा खुलासा होईल, व जरि इंद्रियविज्ञान नांव नाहीं तरी त्रिदोषविज्ञान चांगलें झालें कीं, इंद्रियविज्ञानाची उणीव पडणार नाहीं, पाचक पित्ताचे उदाहरणावरून ही गोष्ट कळण्यासारखी आहे.

___________