पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
आयुर्वेदातील मूलतत्वे.



पित्ताचें तात्त्विक व व्यापक स्वरूप.

  व्यवहारिक भाषेत पित्ताची स्पष्ट कल्पना यावयाची म्हणजे शरिरांतील प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागाचे स्वरूपानुरूप बाह्य पोषकाचा संग्रह झाल्यावर ज्या तैजस तत्वाने त्यांतील पोषक अंश आत्मसात् केला जातो, अशी ती पचन शक्ति होय. आंतडयांतील स्थूल पचनापासून तो अगदी सूक्ष्म घटकापर्यंत हे काम झालेच पाहिजे. त्यांतील उष्णता हे पित्त मात्र आर्द्र पदार्थाश्रयी होऊन कार्य करते. पण आर्द्रावस्था ही तत्वतः कफ आहे. व तीमध्ये उष्णता सामील होते. हे तत्व ध्यानात येण्याकरितां पाचक पित्ताला त्यक्तद्रवत्व, हे विशेषण योजलें आहे; व सर्वत्र तें व्यापी आहे. अष्टांग हृदयाचे शारीरामध्ये वर्णन करतांना, भात शिजण्याचे क्रियेला उदाहरणादाखल घेतली आहे. भांडयांतील पाणी व तांदूळ आर्द्र अर्थात् श्लेष्मस्वरूपाचे व भांड्याला दिली जाणारी आंच तैजस पित्तरूपी पण कार्य मात्र तिचा आंतील पाण्याशी संयोग होऊन होते. व कार्यकारी स्थिति वर्णन करतांना ही उष्णता मिश्रस्थितीत राहते. ती वेगळी राहिल्यास कार्यकारी नाही. शरीर हे नेहमी पच्यमान अवस्थेत राहणारे आहे, अर्थात् त्या अवस्थेत तर त्या उष्णतेचे वर्णन करून भागणार नाही. व याकरतांच पित्ताचे प्रवाही असें वर्णन केले आहे. त्याचे याथार्थ्य उघड आहे.अशा पित्ताला प्रचलित मराठी भाषेमध्ये सोयें असें नांव द्यावयाचे झाल्यास पाचकपिंड, परमाणु किंवा घटक म्हणण्याने वाध येणार नाही सर्व विकारांमध्ये याच स्थितीतील या पाचक परमाणूंचा विचार करावयाचा असतो. व तो यथार्थ झाला म्हणजे विकाराचे स्वरूप ध्यानी येईल. सुगमतेसाठी आयुर्वेदामध्ये पित्ताचे जे चाळीस विकार किंवा लक्षणे सांगितली आहेत, ती त्या त्या जागी कशी संभवतात, याचा विचार करूं, म्हणजे पित्ताचे स्वरूप स्पष्टपणे ध्यानी घेण्याला अडचण पडणार नाही.

______
पित्तजन्य लक्षणे.


चत्वारिंशत् पित्तविकारा:-यथा--ओषश्च, प्लोषश्च दाहश्च, दवधुश्च, धूमकश्च, अम्लकश्च, विदाहश्च अण्माधिक्यं च, अतिस्वदेश्वांग-. गंधश्च, अंगावयवदरणं च, शोणितक्लेदश्च, मांसक्लेदश्च, त्वग्दाहश्च, मांसदाहश्च, त्वचांसदरणं च चमेदरणं च, रक्तकोठश्च, रक्तपित्तं च, रक्तमंडलानि च, हरितत्वं च, हारिद्रत्वं च, नीलिका च, कक्षा च,कामला च, तिक्तास्यता च, पूतिमुखता च, तृष्णाया आधिक्यं च, अतृप्तिश्च, आस्यपाकश्च, गलपाकश्च, अक्षिपाकश्च, गुदपाकश्च, मेदपाकश्च, जीवादानं च,