पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९
या लक्षणांचा खुलासा.



तमःप्रवेशश्च. हरितहारिद्रमूत्रनेत्रवर्चस्त्वं च इति चत्वारिंशत् पित्तविकाराः ॥१॥
 [चरक सू० स्था० अ० २०]

____________
या लक्षणांचा खुलासा.

  १ ओष, २ प्लोष, ३ दाह, व दवथु हे चार विकार म्हणजे दाहाचे प्रकार आहेत. ओष म्हणजे एकाद्या भागी अत्यंत जळजळ होणे. प्लोष म्हणजे त्वचेवर एकाद्या ठिकाणी भाजल्याप्रमाणे दाह होणे व डाग (म्हणजे भाजल्याप्रमाणेच ) पडणे, दाह म्हणजे सर्व शरिराचा आणि दवथु म्हणजे एकाद्या ठरावीक जागीच दाह होणे. असे हे चार प्रकार आहेत.

 दाहाचे वरील चार प्रकार ज्याप्रमाणे एकाच स्थानाचे आणि स्वरूपाचे पित्तविकार आहेत त्याचप्रमाणे, धूमक, अम्लक आणि विदाह हे तीन पित्ताचे विकार किंवा लक्षणे ही एकाच स्थानांतील आणि परस्पर सारख्याच स्वरूपाची आहेत. आणि या लक्षणांकडे विशेषतः तात्विक दृष्टया पाहिल्यास ही केवळ पित्ताच्या आवस्थेतीलच आहेत. किंबहुना या लक्षणांची उत्पादक विकृति कफ घडवून आणतो, असें निदर्शनास येईल. धूमक म्हणजे घशांतून अति उष्णतेमुळे धूर आल्यासारखा भासणे, अम्लक म्हणजे घशांत आणि आमाशयांत अम्लतावाढून टेंकर वगैरे आंबट येणे आणि विदाह म्हणजे आमाशय व अन्नमार्ग यांत जळजळ उत्पन्न होणे; हे विकार कसे होतात ? ज्या वेळी आहारामध्ये, तीक्ष्णोष्णादि पदार्थाचे प्रमाण वाढते, त्या वेळी आमाशयामध्ये जे अन्नाचे पचनाच्या प्रथमावस्थेमध्ये स्वाभाविक माधुर्य यावयास पाहिजे, ते न येतां अन्नविपाक तीक्ष्ण वगैरे गुणांचा होतो. व त्याचा परिणाम समीपचे कंठस्थानावरहि होतो कित्येक वेळी आहारा मध्ये असे पदार्थ नसून उलट स्निग्ध, जड, स्थूल, पिठाचे, कोरडे असलेहि पदार्थ आहारांत आले, किंवा पाण्याचे अथवा द्रव पदार्थांचे प्रमाण आहारामध्ये कमी झाले तर त्यामुळे आमाशयांतील अन्नाचे कफामुळे होणारे आर्द्रीभवन ठराविक मुदतीत न होता, अधिक वेळ अन्न आमाशयांत पडून राहिल्याने ते आंबतें-नासते आंबुसपणा आल्यावर केवळ अपचनानेच त्यामध्ये तीक्ष्णता-अम्लता इत्यादि गुणांचा समावेश होतो, व आंबण्याच्या अगदी प्रथमावस्थेत अम्लक, यापुढील दुसरी अवस्था म्हणजे तीक्ष्णता उत्पन्न होणे. यांत विदाह म्हणजे जळजळ आणि तीक्ष्णतेचा अतिरेक झाला की, धूर आल्यासारखा वाटणे. या स्थितीमध्ये धूमक हे विकार उत्पन्न होतात, केवळ ऊष्ण-

अ....३