पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
आयुर्वेदांतील मूलतत्वे.



गुणाचे वाढीने दाह होईल, पण ही लक्षणे होणारी नाहीत, ही सर्व लक्षणे अम्लपित्त या पित्तविकारांत संभवतात, आणि त्यांतच अपचनाचा उल्लेख प्रामुख्याने आहे. आमाशयांतील नैसर्गिक अन्नाचे आद्रीभवन आणि माधुर्य न झाल्यानेच अम्लपित्तविकार होतो, व त्यालाच अपचनाचा एक प्रकार मानण्यात येईल, पचनाचे प्रत्यक्ष कार्य हे पित्तस्थान जो पच्यमानाशय किंवा लघ्वंत्र यांत होते, तथापि चर्वण, आर्दीकरण ही कार्ये पचन क्रियेला महत्वाचे सहाय करणारी असल्याने त्यांचाहि पचन या नावाने संबोध केला जातो, या सर्व स्थानांत पूर्ण काम होऊन अन्नरस वेगळा होईपर्यंत जरि अन्नामध्ये अवस्थांतरें निराळी असली तरि त्याला पक्वावस्ठा असत नाही, या साठी कित्येक वेळी आम पक्वाशयाची नांवे आणि कार्ये सामान्य रीत्या एकाच नांवाने ओळखण्यांत येतात, तरि हे पोटभेद लक्षात घेऊन आमाशयांत अपचन म्हणजे काय व पच्यमानांत अपक्वता कोणत्या अवस्थेत याचा विचार झाला पाहिजे, घरामध्ये “ आपाशयस्थोहत्वाग्निं, दोपाधामाशयाश्चयाः" इत्यादि वाक्यांनी आमाशयाचा निर्देश केला आहे. तथापि - निरस्य  ज्वलनंबहिः सहतेनाभिसर्पतः तपंतः सकळं वपुः । ज्वरदास्य. रसानुगाः ॥

 या सर्व वाक्यांचा समुच्चयार्थ लक्षात घेतला म्हणजे पाचकाग्नीला बाहेर (लध्वंत्राचे) घालवून रसावरोवर सर्व शरिरात पसरून ज्वर उत्पन्न करतात. ज्या प्रकरणांत निर्दिष्ट असलेला आमाशय म्हणजे पच्यमानाशय होय हे ध्यानात येईल. व अम्लपित्त की, ज्यांत वांति होते आणि अम्लक वगैरे विकारांत अपचन ह्या विकारांतील अविपाक हा पच्यमानाशयांतील नसून आमाशयांतील आहे. असे सहज कळेल. अम्लपित्ताचे सामान्य लक्षणामध्ये--

अविपाकक्लमोक्लेशतिक्ताम्लोद्गारगौरवैः ॥
हत्कंठदाहारुचिभिश्चाम्लपित्तं वदेत् भिषक् ॥१॥ मा. नि.

  (अपचन, ग्लानि, मळमळ, तिखट, आंबट असे ढेंकर, जडपणा, हृदय आणि कंठ यांचे ठिकाणी दाह आणि अरुचि या लक्षणांवरून अम्लपित्त समजावे.) अशा विकारांचा उल्लेख आहे. त्यांत ही तीनहि लक्षणे असून अविपाक आहे. अर्थात् ही लक्षणे अविपाकामुळे होतात हे उघड आहे. आणि आमाशयांत अन्नावर जो पचनाविषयीं संस्कार होतो. तो आर्द्रिकरणाशिवाय नाही.

आदौ पड़संपन्नं मधुरीभूतमीरयेत्।
फेनीभूतं कफं, यस्त्वामाशय संस्थितः ।
क्लेदकः सोन्नसंघातक्लेदनात् ॥