पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
र्लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
५१
या लक्षणांचा खुलासा.



ह्रीं वाक्यें पूर्वी गेली आहेत. म्हणजे हीं तीनहि लक्षणें विदाहि तीक्ष्ण अशा पदार्थांचे प्रभावानें किंवा पचनाचे विकृतीमुळे आमाशयांत आर्द्रावस्थेत असलेल्या अन्नामध्ये अर्थात् आर्द्रावस्थेत असलेल्या पित्तानें उत्पन्न होतात. 'ऊष्णाधिक्यंच' म्हणजे उष्णता अधिक होणें. अर्थात् हा विकार सर्वांगीण आहे. ऊष्णवीर्य पदार्थांचे सहवासाने ऊष्ण प्रदेश किंवा काळ, अवास्तव धातुक्षीणता यांमुळे उष्णता वाढणें हा साधा विकार आहे. पित्ताचे आणखी लक्षण म्हणजे ' अति स्वेदश्च ' ह्मणजे घाम अधिक येणें हें रक्ताश्रयी पित्तानें होतें. रसाचें रक्त बनते त्यावेळी त्यांतील जलांश निरुपयोगी स्थितीत असलेला बाहेर त्वचेच्या मार्गाने टाकण्यांत येतो. उष्णता वाढल्याने हैं पचनाचे कार्य जलद होते. इतकेंच नव्हे तर अधिक उष्णतेचे कार्य रक्त आणि रस यांमध्ये अधिक पातळपणा उत्पन्न करून सूक्ष्म रोमरंध्रांतून त्याचा स्राव होतो. या उष्णतेमुळे या दोन धातूंमधील वास्तविक पोषक अशा घटकांचेहि विलयन होर्ते ( जळतात ) व असें झाल्याने ते घामाबरोबर बाहेर जातात. अर्थात् अशा प्रकारें अति स्वेद झाल्यास धातुपोषणामध्ये व्यत्यय येतो. हा विकार ह्मणजे रक्ताश्रयी उष्णतेची वाढ होय. ' अंगगंधश्च ' ह्मणजे आंगाला घाण येणें, ही घाण घाम आणि रसधातु यांचे अशुद्धतेमुळे येते. सामान्यतः स्निग्धाहाराने रसामध्यें अधिक स्निग्धपणा वाढला असतां तेथील पचनशक्तीनें त्याचे पचन नीट होत नाहीं. आणि अशा अविपक्व स्थितीमध्ये घामाला विदग्धावस्था ( नासणें ) येऊन त्यामुळे अंगाला घाण येते. अर्थात् हा विकार देखील पित्ताचे उष्णतेचा नसून त्यांतील आमगंधी अशा द्रव पित्ताचाच आहे. 'अंगावयवदरणंच' अंग किंवा शरिराचे अवयव फाटणें त्याचप्रमाणें, 'त्वङ्यांसदरणं च ' ह्मणजे त्वचा आणि मांस यांचें विदारण, 'आस्यपाकश्च, गलपाकश्च अक्षिपाकश्च गुदपाकश्च मेद्रपाकश्च ' तोंड येणे, घसा येणें, डोळे येणें, गुदद्वार पिकणें आणि मूत्रमार्गात भेगा पडणें हे सर्व, सात विकार किंवा पित्ताचीं लक्षणें एकाच स्वरूपाचीं आहेत. पित्ताचे गुणामध्यें तीक्ष्ण आणि ऊष्ण असे दोन गुण आहेत. हे गुण ज्यावेळीं एकाद्या भागांत वाढतात त्यावेळीं तेथें या गुणांचे सहवासानें क्षारत्वाची वाढ होते, विशेषेकरून पित्ताचें दूष्यस्थान जें रक्त त्यामध्ये हा गुण उत्पन्न होऊन अशा रक्तानें शरीरपोषण होत असतां क्षाराचे विदारक धर्माप्रमाणे, अंगावयव विदारण होतें, अर्थात् विकृतीचे सामर्थ्याला अनुसरून ह्या लक्षणांत कमी अधिक तीव्रता असेल. रक्त हैं मांसाश्रयी आहे, त्यामुळे असें रक्त जर मांसांत राहील, तर मांसहि सडू लागतें आणि त्याचेच सहवासाने त्वचाही फाटते. डोळे, घसा, तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिय यांचे