पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
या लक्षणांचा खुलासा.




विकार हा नसून अंगावर नीलसर रंग असेंच हे लक्षण मानले पाहिजे. शिवाय क्षुद्ररोगांतर्गत नीलिकालक्षण म्हणजे शरिराचे कोणत्याही भागावर आणि विशेषतः तोंडावर काळा निळा डाग हे आहे.

“ कृष्णमेवंगुणं गात्रे मुखे वा नीलिकां विदुः"
(मा. नि. क्षु. रो. श्लोक ४०)

हा विकार बहुधा जन्मतः असणे अधिक संभवनीय असते. याचेच जोडीचे न्यच्छ, व्यंग, हे विकारही नीरुज म्हणजे वेदनारहित असल्याचा उल्लेख असून न्यच्छ तर एक चिन्ह असल्याचे सांगितले आहे. (न्यच्छं लांछनमुच्यते. मधुकोश) तात्पर्य, नीलिका हे पित्त लक्षण हिरवा, पिवळा या वर्णाप्रमाणेच त्वचेवरील नीलिका मानणे अधिक सयुक्तिक आहे पित्तात्पाद्य वर्णामध्ये नीलवर्णाचा उल्लेख आहे. (पित्तात् पीतं नीलिमा लोहितं वा, इत्यादि ) व म्हणूनच नीलिमा शरीरव्यापि लक्षण मानावे. पित्तामुळे ते वर्ण का व कसे उत्पन्न होतात? याचा विचार करू लागले असतां सहज ध्यानात येईल की शरिरावर अर्थात् त्वचेवर वर्ण उत्पन्न करणे हे भ्राजक या नांवाचें त्वगाश्रयी पित्ताचे कार्य आहे. मात्र या पित्ताचे कार्य व शक्तीचा पुरवठा रक्ताश्रयी पित्तानेच व्हावयाचा. अर्थात् रक्तामध्ये ज्या प्रकारच्या वर्णाचे आधिक्य होईल तो वर्ण त्वचेवर प्रतीत होतो. रंजक पित्ताचे कार्य नीट न होतां रसाला योग्य प्रमाणात रक्तत्व न येईल तर तें रक्त पांडुरवर्णाचे होते. ही पांडुरोगाची उत्पादक अवस्था असते. पण जर यकृत या रक्ताचे आणि पित्ताचे स्थानांत पित्ताची त्याचे कारणांनी वाढ झाली तर अतिरिक्त पित्त रसांत मिळून सर्व शरीरभर पसरतें, पित्ताचा वर्ण पिवळा असून अशा पित्ताचे रक्तामध्ये पीतता वाढते व त्वचेवर दिसू लागते. ही हारिद्रता होय. याच अवस्थेत कामला होते. याहिपेक्षां वाढ झाली तर रक्ताचे शोषण-(करपणे ) होऊं लागेल ही पहिली अवस्था थोडा काळेपणा अर्थात् हरितत्व किंवा हिरव्या वर्णाची उत्पादक असून ही अवस्था फार थोडा वेळ टिकून लवकरच रक्ताचे शोषण होऊन क्षीणावस्थेत निळाकाळा असा रक्ताचा वर्ण त्वचेवर दिसतो. ही नीलिका होय. क्षीणावस्थेमुळे यावेळी हा विकार निव्वळ पित्ताचा न राहतां वातपित्तांचा होऊ शकेल. याच उद्देशानें वायूचे विकारामध्येहि वर्णाचे बाबतींत कृष्णत्वाचा उल्लेख केला आहे. कार्श्यकाष्ण्रयो कामित्वं -वर्णः कृष्णोऽरुणोऽपि वा या अवस्थेमध्ये वातरक्त विकाराचा संभव होतो. अशा रीतीने ही तीन लक्षणे म्हणजे रक्तातील पित्ताच्या वाढीचें प्रमाण दाखविणाऱ्या तीन अवस्था होत. "कामलाच" कावीळ हे लक्षण म्हणजे हारिद्रावस्थेची पूर्ण स्थिति होय. हारिद्रतेचा उल्लेख केलाच आहे.