पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



आणि पित्ताचे विकार म्हणजे केवळ उष्णता नव्हे. अर्थात् पित्ताचे द्रवत्व, विस्तृत्व इत्यादि गुण वाढून त्यामुळे एकाद्या इंद्रियाचे कियेमध्ये व्यत्यय येणे हे या विकारांचें सामान्य स्वरूप आहे. याचे खुलाशासाठीं पित्ताचें मुख्य स्थान जें जठर त्या स्थानांतील एका विकाराचा विचार करूं.

पित्तविकारांपैकीं ज्वर.

 या पित्तस्थानापासून ज्वर हा विकार संभवतो. ज्वर हा विकार अजीर्णामुळे किंवा अव्यवस्थित पचनामुळे होणारा आहे. हवा वगैरे कारणांनी होणारा आगंतु स्वरूपाचा त्याचप्रमाणे विषम वगैरे पोटभेद सोडून दिले म्हणजे जे ज्वराचें वर्णन आहे, त्यामध्ये आमाशयांत पचन न झाल्याने किंवा अग्नि मंद झाल्याने ज्वर उत्पन्न होतो, असा उल्लेख आहे. " मिथ्याहारविहाराभ्यां दोषा ह्यामाशयाश्रयाः बहिर्निरस्य कोष्ठाग्नि ज्वरदाः स्यू रसानुगाः ॥ १ ॥ ( मा० नि०), ' आमाशयं प्रविश्याममनुगम्य पिधाय च स्रोतांसि पक्तिस्थानाच्च निरस्य ज्वलनं बहिः || १ || ( अ० हृ० ), अशा रीतीने ज्वर हा विकार आमसंभचनीय असल्याचा उल्लेख असतां पित्ताचा त्याशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित होईल. तरी उवर पित्ताशिवाय होतच नाहीं असाही आधार आहे. 'उष्णपित्तदृते नास्ति ज्वरो नास्त्यूष्मणा विना || ( अ० हृ० ) ' ज्वर अर्थात् त्वचेवर भासणारी अनैसर्गिक अधिक उष्णता ही पित्ताशिवाय नाहीं असा सिद्धांत आहे. व म्हणून हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पित्ताची वाढ म्हणावी तर आमाशयांत पित्त कमी हाणून अपचन आहे, आणि पित्त कमी ह्मणावें तर ताप आहे. तापणें किंवा उष्णता हा गुण पित्ताशिवाय दुसन्या कोणत्याहि दोषाचा नाहीं. ' तप्' धातूपासून झालेला पित्त शब्द हेंच सांगत आहे. त्वचेत उष्णता अथवा पित्त वाढले पण इतरत्र नाहीं. मग पित्त येतें कोटून व वाढते करें ? ज्या वेळी आहारामध्ये जड व स्निग्ध असल्या पदार्थांचा अधिक उपयोग होतो, त्या वेळी असल्या पदार्थमुळे आमाशय ( या प्रकरणी आमाशय हा शब्द पच्यमानाशय अथवा लध्वंत्र याला उद्देशून आहे. हे पुढील विवेचनावरून ध्यानी येईल. ) म्हणजे सर्व लहान आतडी या असल्या अन्नाने भरल्यामुळे त्यांतील सूक्ष्म अशी स्रोतसे - -छिद्रे असल्या अन्नाने भरतात- बंद होतात, व त्यामुळे त्या स्रोतसांतून अन्नपचनाला उपयोगी असा पाचक पित्ताचा स्राव होत नाहीं. अर्थात् अन्नस्पर्शाने जरी या सर्व अन्नाला संवेदना आणि चलन प्राप्त होते व त्यामुळे सर्व स्रोतसांचे अंतर्गत असा रस किंवा पित्त स्रवतें तथापि स्रोतसें बंद झाल्यामुळे त्याचा अन्नांत प्रवेश