पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
(४)

डॉक्टरांनी व इतर विद्वानांनी केला. परंतु आयुर्वेदाचा अधिक परिचय करणारांची संख्या वाढत असून सध्या आयुर्वेदाताल त्रिदोषांविषयीं बऱ्याच शोधक डॉक्टरांचा ग्रहही अनुकूल होत आहे. मद्रास सरकारानें नेमलेल्या चौकशी मंडळाचा अहवाल पाहता ही गोष्ट उघड होईल. अलिकडे पुष्कळ विद्वान् व शोधकडॉक्टर आयुर्वेदाच्या उपपत्तिला शास्त्रीय म्हणून लागले असून आयुर्वेदाचा पुरस्कारहि वाढत्या प्रमाणांत आहे. तरीपण त्रिदोषांविषयी सार्वत्रिक विश्वास असावा तसा नसून आयुर्वेदांतील त्रिदोषांना मान्यता देणाऱ्या मध्येही त्याविषयी असावी तितकी खात्री व योग्य कल्पना दिसत नाही.
 अशा प्रकारची संदेह वृत्ति आयुर्वेदाच्या उद्धारार्थ चाललेल्या, प्रयत्नांना फार विधातक आहे. आयुर्वेदाला शास्त्रीयत्व आहे. असें म्हणावयाचे तर त्याचे मूलभूत उपपत्तिला अनुसरून आयुर्वेदाची निदान चिकित्सा पुरी व्हावयास पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करण्यांत येते आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या पुष्कळ डॉक्टरांत किंवा कित्येक सुधारणावादी आयुर्वेदीय चिकित्सकांतहि अशा प्रकारची मते दिसतात की, त्यांना आयुर्वेदांमध्ये शारीर, इंद्रियविज्ञान रसायन इत्यादि विषयांची भर घातल्याशिवाय आयुर्वेदाला पूर्णता येणार नाही असे प्रामाणीकपणे वाटते. पण हे लोक विसरतात की, चिकित्सा शास्त्रांत जर इंद्रिय विज्ञान आणि रसायन या मुख्य अंगाची उणीव असेल तर त्याला शास्त्र तरी करें म्हणावें? आयुर्वेदाला शास्त्र म्हणावयाचें तर आयुर्वेदाच्या त्रिदोषांच्या उपपत्तीने स्वास्थविज्ञान, रोगविज्ञान व उपायविज्ञान या मुख्य गोष्टी उत्तम प्रकारे करतां यावयास पाहिजेत. आणि आयुर्वेदाच्या विशिष्ट पारीभाषिक दृष्टीने त्रिदोषांचा विचार करतां त्या करतां येतात. मग आयुर्वेदाचे विवेचन संक्षिप्त असेल किंवा तें प्रचलित भाषापद्धतीहून वेगळे असेल त्यांत सुगमता व स्पष्टता येण्यासाठी त्याचे विस्तृत वर्णन करणे अवश्य असन तें करावयास पाहिजे ही गोष्ट वेगळी. अर्वाचीन पद्धतीप्रमाणे अनेक शास्त्रीय विभागांचे वेगवेगळे वर्णन आयुर्वेदांत नसलें तरी त्याचे सूत्रमय भाषेच्या विशिष्ट परिभाषेला अनुसरून अर्थबोध करून घेतल्यास त्यांत सर्व प्रकारच्या शास्त्रीय शाखांची तत्वे सुसंगत रीतीने उपलब्ध होतात.
 आयुर्वेदाचा वाङ्मय विकास थांबल्यामुळे आणि प्रतिकूल