पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
पित्ताविकारापैकी ज्वर.



व मिश्रण होऊ शकत नाही, आणि असे झाल्याने कोठ्यांतील अन्न पचत नाही. परंतु स्रवणारा रस हा याच अन्नाचे बहिर्मुख अशा रसवाहि स्रोतसांचे सान्निध्यामुळे त्यांचेमधून रसांत मिश्र होऊन रसपचनाचे स्थान जें यकृत त्यामध्ये येतो. अन्नाचे स्रोतसांमध्ये अंतर्मुख व बहिर्मुख असा भेद कदाचित् आयुर्वेदीय दृष्टीला अपरिचित असा वाटण्याचा संभव आहे तरी आमाशयं प्रविश्य, स्रोतांसि पिधाय, पक्तिस्थानात् ज्वलनं बहिनिरस्य, सहते नाभिसर्पतः, रसानुगा या सर्व वाक्यांचा सुसंगत अर्थ असाच होतो. अंतर्मुख स्रोतसें बंद झाली म्हणूनच अग्नि किंवा पित्त बाहेर येऊन रसानुगामी होते. व ज्याअर्थी ते रसानुगामी होते असा उल्लेख आहे, त्याअर्थी बाहेर पडणारी स्त्रोतसे असून ती रुद्ध नसतात ही गोष्ट उघड होते. सर्व शरीर स्रोतोमय असल्याचा उल्लेख आहे (स्रोतसामेव सगुदाय पुरुष मिच्छति । चरक) आतां ही प्रत्येक भागांत जी स्रोतसे असतात त्यांत प्रामुख्याने पोषक घेणे व मलोत्सर्जन करणे ही कामे करणारे दोन भाग असलेच पाहिजेत. नाहीपेक्षा आदान आणि विसर्ग होणार नाही. रसविक्षेपाचे वर्णन करत असतां व्यानवायूचे 'विक्षेपोचित्तकर्मणा' हे विशेषण योजून सर्व शरीरात विक्षेप होतो. अर्थात् विक्षिप्त पदार्थांचा संग्रह करून पुनश्च विक्षेपासाठी संकोच पाहिजे हे उघड आहे. व म्हणूनच 'सम्यग्गत्या च धातूनां' ह्मणजे धातूमध्ये व्यवस्थित गति अर्थात् साहचर्य हे वायूचे कार्य सांगितले आहे. संकोचविकासात्मक क्रियेमध्ये मलस्वरूप धातूचे पुनरागमन होत असते. याच क्रियेला वायूमुळे होणारा निग्रह असें नांव आहे, शरीरभर पसरलेले दोष यामुळे परत येतात; व तसे घडल्यावर शोधन ध्यावे असा जो शोधनप्रकरणी उल्लेख आहे, त्याचाहि आशय हाच आहे.

वृध्याभिष्यंदनात् पाकात् कोष्ठं वायोश्च निग्रहात् ।
सर्वदेहप्रविस्टतान् सामान् दोषान्न निर्हरेत् ।
दीपनैः पाचनैः स्नेहैस्तान् स्वेदैश्च पारसःकृतान ।


स्नेहक्लिन्नाः कोष्ठगा धातुगा वा स्रोतोलीना ये च शाखास्थिसंस्थाः दोषाः स्वेदैः सेद्रधीकृत्य कोष्टं नीताः सम्यक् शुद्धिभिनिहिर्यंते॥१॥

 अशा रितीने पुनरागमन सुचविणारी प्रमुख वाक्ये आयुर्वेदांत आहेत, त्यावरून ही छिद्रें दोन प्रकारची असतात, हे उघड ठरते. म्हणजे शरिराचा प्रत्येक भाग अंतर्मुख आणि बहिर्मुख असा छिद्रमय आहे, असे म्हणणेच सयुक्तिक आहे.त्यामुळे ज्यावेळी लध्वंत्र किंवा पच्यमानाशयांतील अंतर्मुख स्रोतसांचे अवरोधामुळे आंत स्रवणान्या पाचक