पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
आयुर्वेदातील मूलतत्वे.



पित्ताला अडथळा येतो, त्यावेळी बाहेरील रसनिसर्गमनाची जी स्रोतसें, त्यांतून तें रसाबरोवर यकृताकडे जाते. याच अवस्थेमध्यें दुसरा आणखी एक असा दोष उत्पन्न होतो कीं, अन्नाचे पचन नीट न झाल्याकारणानें त्यांत आंबुसपणा येतो. आणि त्यांतून जो थोडाफार अन्नरस निघतो,
 (स्रोतोरोध झाला तर अगदीच अन्नरस त्यांतून निघत नाहीं. ) अशी व्यवस्था सर्व ज्वरांत होत नाहीं. पूर्ण जर स्रोतोरोध होईल तर त्यापासून इंद्रियनाश होऊन विकाराला असाध्यता येईल, संनिपात व त्यांतहि अभिन्यास या प्रकारामध्ये अशी स्थिति प्राप्त होते. व म्हणूनच तो असाध्य सांगितला आहे.
 (प्रत्याख्यात' समूयिष्ठः कश्चिदेवान्न सिध्यति ) तोहि विकृत व आमविकृतीमुळे - विदग्धतेमुळे किंवा आंबुसपणामुळे पित्तालाच वाढविणारा असतो. अशाप्रकारें उन्मार्गगामी पित्त आणि अन्नाचे विकृतीमुळे उत्पन्न होणारें पित्त अशी पित्ताचे उभय स्वरूपाची वाढ रसांत होऊन असा रस सर्व शरिरांत पसरल्यावर रसरक्ताश्रयी अशा उष्णतेमध्ये ही अधिक आणि अनैसर्गिक व अपरिचित भर पडते, व ही उष्णता म्हणजे ताप होय; अर्थात् तापांतील उष्णता पित्ताची असते म्हणून पित्ताशिवाय उर नाहीं हा अभिप्राय आहे. मात्र ही पित्तविकृति म्हणजे तत्वतः शरिरांत पित्ताची वाढ नसून एका भागांत उणीव व दुसऱ्या भागांत अधिक भर अशी स्थिति असते. ज्या पचनेंद्रियांमध्ये पित्ताचें योग्यकार्य झाल्याने शरीरपोषण व्हावयाचें त्यांतील हैं पित्त नको त्या भागी जाते. अर्थात् कमी झाले त्या ठिकाणी कमीपणामुळे, आणि नको त्या जागी अधिकपणामुळे असे उभय स्वरूपाचे विकार ही पित्तविकृति कोठ्यांतील अजीर्णलक्षणे आणि रक्तादि धातूंतील ताप वगैरे लक्षणांनी उत्पन्न करते. अशाप्रकारे पित्त हैं भलत्यामार्गाने जाऊन रोग उत्पन्न करते, त्यामार्गभ्रष्टतेलाच आयुर्वेदानें उन्मार्गगामिता किंवा कोप हीं नांवें दिली असून रोगगणनेमध्ये अशा प्रकारचे उत्पादक विकृतीचा समावेश केला आहे. आणि निदान ठरवितांना विशेषतः याच विकृतीचें स्वरूप ध्यानी ध्यावयास पाहिजे, केवळ न्यूनता अथवा वृद्धि सामान्यत्वें त्या त्या भागांतील कार्यांवर न्यूनता किंवा आधिक्य उत्पन्न करील. पण रोगोत्पादक नाहीं यासाठी ज्या ठिकाणी ही उन्मार्गगामिता सुरू झाली तेथपासून उन्मार्गप्रवृत्त असा हा विकृत दोष ज्या ठिकाणी थांबून विकार उत्पन्न करतो, तेथपर्यंतचें ज्ञान म्हणजे रोगसंप्राप्तीच्या प्रदेशाचे ज्ञान होय. एकाद्या भागीं ज्यावेळीं उन्मार्गप्रवृत्त दोषापासून विकार सुरू होतो, त्या ठिकाणी दोषाचा स्थानसंश्रय मानण्यांत येतो. व येथे रोग उत्पन्न करणारा दोष कोठपासून विकृत झाला हें पाहाणें अवश्य असतें. अशा रितीनें ज्वर पित्ताने येतो. याचा अर्थ विमार्ग