पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९
पित्तविकारापैकी ज्वर.



प्रवृत्त पित्तानें येतो असा आहे. क्वचित् पित्तज्वरामध्यें, पच्यमानाशयांत पित्ताचें आधिक्य असतें. कारण पित्तल आहारापासून या ठिकाणीहि स्वाभाविकच पित्ताची वाढ होत असते. तथापि जर पित्ताची केवळ वाढच असेल तर त्यामुळे अंतर्दाह वगैरे स्थानिक लक्षणे होतील, परंतु ज्वर यावयाचा म्हणजे पूर्वीप्रमाणेच स्रोतोरोध होऊन पित्ताची उन्मार्गगामिता झाली पाहिजे. यामध्ये विशेष इतकाच असतो कीं, जो थोडा फार अन्नरस तयार होतो तो इतर ज्वरांपेक्षां अधिक पित्तप्रधान असल्यामुळे रसामध्ये पित्ताचे प्रमाण फार होतें व त्यामुळे ज्वराची तीव्रता असते. पित्तज्वरामध्ये ' वेगस्तीक्ष्णः ' म्हणून सांगितलेले लक्षण याच कारणामुळे होतें. तरी ज्वर हा 'निज ' विकार पित्ताचे उन्मार्गगामितेशिवाय होत नाहीं हें निर्विवाद आहे. 'पित्ताने ज्वर' याचा अर्थ असा आहे. दुसरा पित्ताचा विकार रक्तपित्त हाहि विकार असाच पित्ताचे उन्मार्गावस्थेत होणारा आहे. पित्तयुक्त आणि आम असा अन्नरस यकृत्प्लीहेमध्ये जाऊन तेथे न थांबतां शरीरभर पसरतो. त्या वेळीं ज्वर उत्पन्न होतो. परंतु असा रस जर यकृत्प्लीहेमध्येच विकृति करील तर रक्तपित्त होते. लध्वंत्राप्रमाणेच येथेहि अन्नरसावर रंजकपित्ताचे पचनकार्य व्हावे लागते. हें कार्य न होतां जर अतिरिक्त पित्त या भागांत संचित होईल तर त्यामुळे पित्ताचे अतितीक्ष्णतेमुळे मृदुमांसमय अशा यकृत्प्लीहेच्या स्रोतसांना तें सहन न होऊन त्यामुळे ती क्षतयुक्त होतात. व त्यांतून रक्त आणि पित्त यांचा स्राव मुखावाटे होतो. किंवा असेंच पित्त पच्यमानाशय वृक्क ( मूत्रपिंड ) यांमध्ये वाढून तेथील स्रोतसांत छिद्रे होतील तर रक्तासहवर्तमान गुदद्वार किंवा मूत्रमार्ग यांतून पडतें. आणि बेसुमार वाढ झाल्यास ह्या विकृतीला पुरूनहि सर्व शरिरांत व्यापून रसरक्तवह स्रोतसांत विदाह व क्षतोत्पत्ति करून रोमरंध्रांतून बाहेर पडते. ही अत्यंत वाढीची विकृति आहे. रक्तपित्त म्हणजे केवळ रक्त नव्हे. तर रक्तमिश्र पित्त असतें. आणि जें पित्त पडते तें अर्थातच अस्वाभाविक मार्गानें पडते. म्हणजे हीहि उन्मार्गावस्थाच होय. याला कारण ज्वरारंभक विकृति असते. याच विकृतीचे आधिक्याचा परिणाम रक्तपित्त असते. व म्हणूनच ज्वरसंतापाद्रक्तपित्तमुदयिते ज्वरसंतापामुळे रक्तपित्त होतें. असा उल्लेख आहे. एकादेवेळी ज्वरोत्पादक विकृति आमाशयांत झाली, अशा अवस्थेत जर रोग्याचीं यकृत प्लीहा इत्यादि स्थानें पूर्वविकृतीमुळे दूषित अगर अशक्त असतील तर उन्मार्गगामीपित्त, व दूषित अन्नरस यांची व्याप्ति सर्व शरीरभर होऊन ज्वर येण्यापूर्वीच रक्तपित्त होईल. व पडून संपण्याइतकेंच पित्त असल्यास ज्वर येणार नाही. पण जर रक्तपित्त होऊन त्यायोगें पित्तदोषाचा त्रास झाला नाहीं