पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


तर पुन्हां रक्तपित्त होऊनहि वर होऊ शकेल. अशा रितीनें ज्वराचे आधीं मागाहून किंवा ज्वरांतहि रक्तपित असण्याचा संभव आहे. मात्र रक्तपित्त स्वतंत्र विकार असो वा एकाद्या विकारांत उपद्रव, तीव्र उपद्रव - म्हणून असो, त्यामुळे रक्तस्थानांतून छिद्रोत्पादन करून पित्ताची उन्मार्गप्रवृत्ति हेंच स्वरूप असावयाचें अर्थात् केवळ उष्णता एवढेच याचें स्वरूप नसून प्रवाही अवस्थेत तीक्ष्ण गुणाची अत्यंत वाढ हे कारण असतें. असलें पित्त रक्तांत राहिल्यानें ( रक्त, पित्ताचें स्थान आहे. ) ही तीक्ष्णता रक्तवाहिन्यांना सहन न होऊन त्या फाटतात. व रक्तपित्ताचा मिश्रस्राव होतो, यालाच रक्तपित्त नांव आहे. आगंतुक जखमेमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला अर्थातच रक्तपित्त नांव नाहीं. रक्तपित्त म्हणजे वाढलेल्या पित्ताचा रक्तमिश्र स्राव होय. केव्हां केव्हां राजयक्ष्म्यांत ऊर्ध्वगामी, प्रमेहांत अधोगामी असे रक्तपित्त उपद्रवरूपानें असतें राजयक्ष्म्यामध्ये तर अकरालक्षणांत त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. परंतु या विकारांत जें रक्तपित्त सांगितलें आहे त्याचे आणि रक्तपित्त या विकाराचे स्वरूप वेगळं असतें. पूर्वीचें स्वरूप ध्यानीं घेतां त्यांत अन्नरसाची विकृति आद्य आहे परंतु राजयक्ष्म्यामध्ये अन्नरस विकृत नसतो. याचा उल्लेख मागें आलाच आहे. अर्थातच कफाचे संसर्गाने त्याचे विदग्धावस्थेत होणारे रक्तपित्तस्थानीं लक्षण असतें. (याचा खुलासा मागें कफशयांत आला आहे ) त्याचप्रमाणे प्रमेहोत्पादक विकृति ज्यावेळी वृक्कांत होते त्यावेळीं तीक्ष्णोष्यादि अशा कारणांनीं वृक्कामध्ये जर पित्तविदाहामुळे व्रण होईल तर मूत्राबरोबर रक्तपित्त पडेल हेंहि लक्षण अर्थात् स्थानी असेलच, तथापि सर्वामध्यें पित्ताची उन्मार्गगामिता मात्र असावयास पाहिजे. पहिल्यांत पच्यमानाशय आणि रक्तस्थाने व रक्तवाहिनी इतकीं स्थानें पित्तदूषित होतात, तर दुसन्यामध्ये पच्यमानाशय दूषित असलाच पाहिजे असें नाहीं. ज्या भागांत हा विकार तेवढेच स्थान उर, वृक्क इत्यादि दूषित असतें. तिसरा पित्ताचा विकार-आम्लपित्त-हा विकार पित्ताचा म्हणून सांगण्यात आला आहे. वांती होणें आणि ती आंबट, तिखट, कडु, हैं या विकाराचें सामान्य आणि मुख्य लक्षण आहे. वांती हा विकार कफस्थान जे आमाशय त्याचा आहे. आमाशय है पित्त आणि कफ यांचे स्थान आहे. असा त्याचा स्थान निर्देशामध्ये उल्लेख येऊन गेला आहे, तथापि आमाशय है जें पित्ताचें स्थान म्हणून सांगितलें आहे, ते पच्यमानाशयाला अनुसरून आहे. ज्वरांचे संप्राप्तीत आमाशयाचा उल्लेख आहे. त्यावरून कफस्थान आणि पित्तस्थान एक असणार नाहीं. कारण एक उष्ण आणि दुसरा शीत असे हे दोन परस्परविरोधि गुण एकत्र कसे नांदावे ? शिवाय, अन्नपचनाचे विवेचनामध्ये आमाशय हैं कफस्थान असून त्या